पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १५४ ) हेबांनी प्रतिपादन केले होते व हर्शलकमिटीतही करांपासून आणखीं उत्पन्न होण्यासार आहे किंवा नाही याबद्दल विचार झाला ; त्यांनी दिले- ले अभिप्रायाचा गोषवारा खाली दिला आहे तो फासेटसाहेबांचे मतास अ- नुसरून आहे. 16 जास्त कर बसविणे शक्य आहे किंवा कसें. जमीनबाब-हिंदुस्थानांतील जमीन धारण करणारे लोकांस चांदीचा भाव उतरल्यामळे फायदा झाला आहे. तेव्हां त्यांचेवर कर बसविणे स्वाभाविक आहे, परंतु त्या जमिनीचा कर एकचतुर्थांश कायमचा ठरलेला आहे व बाकीचाही अलिकडेच ३० वर्षांचे मुदतीचा ठरलेला असलेमुळे जमिनीचे धारे वाढवून व- सूल वाढविण्यास साधन नाही. मिठ वर कर-ह्या कराचे अयोग्यतेबद्दल आतां मतभेद नाही. तो सर्व लोकांवर व विशेषतः गरीब लोकांवर जास्त बसतो. हल्लींचेपेक्षां तो एकपंचमां- शाने वाढविला तरी उत्पन्न रु. १५०००००० होईल. लढाईचे किंवा दुसरे जरुरीचे प्रसंगी पैसे उभारण्यास या कराचा उपयोग होण्यासारखा आहे, तेव्हां हा कर हल्लीच वाढवून त्या जरुरीच्या प्रसंगास उपयोगी पडणारे साधन नाहींसें करून टाकणे योग्य नाही. ष्टांपाचा कर-हा न्यायमनसुब्याचे संबंधाने कर आहे तो वाढविता येत नाही. दारू-अपकारीचा करही वाढवितां येत नाही; कारण की त्यापासून विशेष उत्पन्नहीं होणार नाही व चोरून दारू करण्यास उत्तेजन येईल व त्यामुळे त्या व्यसनाचा जास्त प्रसार होईल. आयात मालावर जकात घेण्यास झालेले पराव्यावरून तकरार दिसत नाही. तरी तो कर बसविण्यास विलायतेंत हरकती घेण्यांत येतील व हिंदुस्था- नांत तयार होणारे मालावर जकात वसवावी अशी उलटी तकरार करण्यांत येईल. मुंबई वगैरे ठिकाणी होणारे गिरण्यांतील मालावरही जकात सहज घेतां येईल, परंतु देशभर जे लहान लहान कारखाने आहेत त्यांचेकडून कर वसूल करून घेणे अशक्य आहे. निर्गत मालावर जकात-निर्गत मालावर जकात बसविण्यास हरकती पुष्कळ आहेत. अशा प्रकारची जकात हल्ली तांदुळावर मात्र आहे ती वाढविणे अशक्य आहे.