पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सार्वजनिक वाचनालय रोड (पुणे) COORNA हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति. संक्षिप्त वर्णन... भाग पहिला. हिंदुस्थानचें क्षेत्रफळ व लोकसंख्या. हिंदुस्थानांतील इंग्रजी राज्याचे राजकीय गोष्टींसंबंधाने दोन भाग आहेत; पहिल्यांत प्रत्यक्ष इंग्रजांचे अमलाखाली असलेले प्रांत येतात व दुसऱ्यांत प्रोटेक्टेड् [ संरक्षित ] संस्थाने येतात. ही संस्थाने सुमारे ६९० आहेत. हिंदुस्थानांतील इंग्रजी राज्याचे क्षेत्रफळ १५६०१६० चौरस मैल आहे व लोकसंख्या २८७२२३४३१ आहे. त्याशिवाय जंगली प्रांतांत ११२०००० लोकवस्ती आहे. तसेंच फ्रेंच व पोर्तुगीज अमलाखाली असलेले हिंदुस्थानाचे भागांत ८४४००० लोकवस्ती आहे. एकंदर हिंदुस्थानची वस्ती २८९२००००० ह्मणजे सर्व जगां- तील एकपंचमांशाइतकी आहे. खालील कोष्टकावरून इंग्रजीतील प्रांत व संस्थाने यांत लोकसंख्येची वाटणी शी झालेली आहे तें दिसून येईल. क्षेत्र. जनसंख्या. इंग्रजीतील प्रांत ९६४९९३ २२११७२९५२ संस्थानांतील ५९५१६७ ६६०५०४७९ बेरीज १५६०१६० २८७२२३४३१ १