पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) एकंदर लोकसंख्येपैकी संस्थानांत शेकडा २३ आहे व त्या संस्थानांचे अम- लाखाली एकंदर देशाचे भूमिभागापैकी ३८ टक्के जमीन आहे. तीत क्षेत्राचे मानाने पाहतां वस्ती कमी आहे. काश्मीर, पश्चिमराजपुताना, व मध्यहिंदुस्था- नांतील डोंगरी भाग व बंगाल प्रांताचे नैत्य दिशेकडील भाग ह्यांत लोकवस्ती दाट नाही. मध्य प्रमाणाने इंग्रजी राज्यांत चौरस मैलास २३० लोकसंख्या पडते व संस्थानांत १११ पडते. संस्थानांत अत्यंत पातळ वस्तीचा भाग बटला ह्मणजे जसलमीर आहे, तेथे मैली ७ माणसें पडतात; व अत्यंत दाट वस्ती रोहिलखंडांतील रामपूर संस्थानांत आहे, तेथे वस्ती मैली ५८३ पडते. इंग्रजी प्रांतांत ब्रह्मदेशांत उत्तरखिंडविन प्रांतांत अत्यंत पातळ वस्ती आहे, तेथें मैली ४ माणसें पडतात व जास्त वस्ती ह्मणजे बिहारांतील सरणांत आहे, तेथें मैली लोकवस्ती ९३० पडते. इंग्रजी प्रांत व संस्थाने मिळून घेतली तर सरासरीने वस्ती मैली १८४ पडते. गंगा नदीचे कांठचे प्रांतांत दरमैली लोक- वस्ती ८७७ आहे व त्या प्रांताची जमीनही अत्यंत सुपीक आहे. अशा प्रकाराने पार्दू गेले असतां, सुपीक जमीन व दाट लोकवस्ती अशी स्थिति हिंदुस्थानांत दुसरे ठिकाणी नाही. मद्रास व पंजाव प्रांतांत दरमैली ६०० वस्ती पडते असा एक जिल्हा आहे, बंगाल्यांत सोळा आहेत, व नार्थवेस्ट प्रांतांत १४ आहेत.. मुंबई इलाख्यांत अत्यंत जास्त वली एणजे मैली ५४२ आहे. ब्रह्मदेश, सिंध मध्यप्रांत व व-हाड या प्रांतांत कोणतेही जिल्ह्यांत २३० पेक्षा मैली जास्त वस्ती पडत नाही. प्रांतवार लोकसंख्या कशी आहे हे पुढील कोष्टकावरून दिसून येईल. साचालक सालानालय SALLYN CPOONA)