पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विलायतेंतील खर्चाचा प्रांतिक जमाखर्चाशी संबंध नाही, परंतु ते आंकडे फक्त या पत्रकाचा व या भागाचे प्रारंभी दिलेले पत्रकाचा मेळ पडण्यासाठी दिले आहेत. या भागांतील ग्रारंभीचे पत्रकांतील तिसरे भागासंबंधाने थोडी माहिती सां- गून हा भाग आटपण्याचा आहे. १६. आगगाड्या व पाटबंधारे कर्ज काढून त्या भांडवलाने सरकार करतात हे वर सांगितले आहे, व त्याबद्दल पब्लिकवर्सचे भागांत विशेष विस्ताराने सांगण्यांत येईल. याप्रमाणे कर्ज काढलेले रक्कमेवद्दल सदरचे पत्रकांत पहिली रकम आहे. दुसरी रक्कम कर्जाबद्दल आहे. हे कर्ज सन १८९३ चे मार्च महि- नाअखेर हिंदुस्थानांत रुपये १०२९३७५५२ चें होतें व विलायतेस पोट १०७४०४०१४३ इतके होते. रुपयांत कांहीं कर्ज आहे व कांहीं पौंडांत आहे. त्यापैकी रुपयांतील कर्ज हिंदुस्थानांतील लोकांकडे सुमार ३० टक्के होते. या क- जापकी सन १८९१ अखेर कर्ज शिलक होते त्याची फाळणी पुढे लिहिल्या- प्रमाणे आहे. आगगाड्यांसाठी रुपये १०५७७२८५६० पांटबंधाऱ्यांसाठी रुपये २८३२०७०४० इतर कामांसाठी रुपये ७६००२९००० बेरीज २१००९६४६०० आगगाड्या किंवा पाटबंधाऱ्यांसाठी काढलेलें कर्ज खर्च होईपर्यंत कर्जाचे सदरांत दाखविले असते, व ती कामें झाल्यावर तें कर्ज या कामाचे भांडवला- चे सदरी जाते. प्रत्यक्ष काढलेले कर्जाशिवाय साव्हिंग व्यांकांचे पैसे किंवा दुसरे ठेवीचे शिलकेंतून ही पब्लिकवर्क्सची कामें करण्यांत येतात व त्याप्रमाणे खर्च झालेल्या रकमा त्या कामाचे भांडवलाचे सदरी जातात. याप्रमाणे या पैशांचा विनियोग झालेले पैशाचे व्याज उत्पन्नांतून येते व त्यामुळे कर्जाचे व्याजाबद्दल- चा खर्च कमी होत चालला आहे. लोकमत-येथपर्यंत जमाखर्चाचे संबंधाने हिंदुस्थानची स्थिति कशी आहे तें सांगितले. आतां या भागांतील काही मुद्यांचे बाबतीत मतभेद आहे त्यासंबंधाने सांगून हा भाग संपविण्याचा आहे. १ कराचे बोजासंबंधानें असें ह्मणणे आहे की ले कांस तो सोसण्याचें जितकें सामर्थ्य आहे तितका तो होऊन गेला आहे व हल्ली जमेच्या मुख्य वावी आहेत त्यांपासून जास्त वसूल होण्यासारखा नाही. याप्रमाणे १४ वर्षांपूर्वी फासेटसा-