पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१५० ) वरच ब्रह्मदेश घेतल्यावर त्या प्रांताची सन १८८६।८७ साली जमा रुपये २२२५००० व खर्च रुपये २२९१२००० होता ; ह्मणजे निवळ जास्त खर्च रुपये २०६८७००० चा झाला होता. तेव्हापासून जमा वाढत चालली आहे. सन १८९११९२ साली जमा रुपये १११५३००० झाली व खर्च रुपये २५०७२००० झाला, हणजे निवळ जास्त खर्च रुपये १३९१९००० झाला. दुष्काळ व सामंतांतील लढाया वगैरेंनी हा खर्च प्रसंगोपात वाढत जाणार आहे. येथपर्यंत जमा व खर्चाचे बाबींचे संबंधानें हकीकत संक्षिप्त रीतीने सांगण्यांत आली. आतां या विषयाशी संबंध असणाऱ्या तीन विषयांची ह्मणजे नाणे, कराचा बोजा, व प्रांतवार जमाखर्चाची फोड यांबद्दल थोडक्यांत माहिती सांगण्याची आहे. १३. या देशांतील नाणे कोणते प्रकारचे आहे ते सांगण्याची जरूर नाही. पैशा- सून रुपयापर्यंत धातूचे नाणे हे सर्वांनी पाहिलेलेच आहे. सन १८९३ सालचे कायद्याप्रमाणे आतां पौंड हे कायदेशीर नाणे झाले आहे. त्याचे वजन व त्यांत खरें सोने किती व हीण किती हेही कायद्याने नियमित झालेले आहे. नोटा-(का- गदी नाणे) हेही सर्वांनी पाहिलेलेच आहे. सर्वांत खालचे प्रतीची नोट ह्मणजे पांच रुपयांची असते व जास्त किमतीची नोट ह्मणजे दहा हजार रुपयांची असते. दरम्यान दहा, वीस, पन्नास, शंभर, पांचशे व हजार रुपयांच्या अशा नोटी असता- त. कागदी नाणे जितके रुपयांचे असेल तितके किमतीची चांदी किंवा नाणे सर- कारचे जवळ शिलक असावे असा नियम आहे. ह्यापैकी काहींच्या प्रामिसरी नोटी घेऊन ठेवलेल्या असतात. सन १८९३ सालच्या मार्चीत २६ कोटि ४० लक्ष रुपयांच्या नोटी चालू होत्या. सन १८७२ पासून १८८८ पर्यंत १२ कोटींपासून १६ कोटींपर्यंत रुपयांच्या नोटी चालू होत्या. सन १८९१. पा- सून नोटी वाढविण्यांत आल्या. या नोटी काढण्याची कलकत्ता, मद्रास, मुंबई, अलहाबाद, लाहोर, कराची, रंगून, कालिकत अशी आठ ठिकाणे आहेत. १४. जमेच्या बाबींपैकी काही अर्थशास्त्रदृष्टया कराच्या स्वरूपाच्या आहेत, व काही नाहीत. कराचा बोजा माणशी किती पडतो ते पुढील पत्रकावरून दि- सून येईल; व त्याचे पुढे कराच्या स्वरूपाच्या नाहीत अशा काही बाबी आहेत व्यांचा बोजा माणशी कसा बसतो ते दाखविले आहे.