पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४७ ) पैशांतून होतात व ज्यांचेबद्दल जमेचा हिशेब ठेवलेला असतो ती; दुसरा वर्ग ह्मणजे लहान कामें. १८९१-९२ सालीं मेजर ( मोठी) कामांची जमा रुपये २०७७९२६० झाली होती, पैकी रुपये ६७३१८९० ही रक्कम जमीनवावीपैकी या खात्यांत हिस्सेरशी जमा करण्यांत येते ती होती. खर्च रुपये १८७११२३० झाला होता. तेव्हा या कामांत तोटा नाही. किरकोळ कामांत जमा रुपये १९४११४० व खर्च रुपये १०७३८९६० होता. या खात्यास हुंडणावळीचा खर्च नाही. विहिरी सरकारमार्फत बांधण्यात येत नाहीत. त्या वांधण्यासाठी लोकांस तगाई देण्यात येते. महत्वाचे कामांसाठी मात्र खर्चाचे रकमेचा व चालू जमेच्या रकमेचा वेगळा हिशेब ठेवण्यात येतो. लहान कामांचा असा वेगळी हिशेव ठेवण्यात येत नाही. लहान कामें बांधण्याचा खर्च चालू जमेंतून होतो. आगगाड्या, पाट-बंधारे यांचेशिवाय या खात्याची तिसरी शाखा रस्ते व इमा- रती तयार करणारे खातें ही आहे. यांत लष्करी व सिव्हिल असे दोन भाग आहेत; त्यांपैकी लष्करी पालकवर्क्स खात्याबद्दल पूर्वी सांगण्यांत आलेच आहे, व सिव्हिल भागाबद्दल पुढे पब्लिकवर्क्स खालाचे भागांत सागण्यांत येईल. सन १८९१-९२ साली या खात्यामार्फत खर्च किती झाला होता व चालू साला याबद्दल किती रकम दाखल आहे ते पुढील आंकड्यांवरून दिसून येईल. मिलिटरी वर्क्स सिव्हिल वर्क्स जमा रुपये. ४९७९४० ...५७७३३०० खर्च रुपये. १२१४५१८० ४९९४२३४० ... ६२७१२४० ६२०८७५२० १८९४-९५ सालचे बजेटांत या खर्चाबद्दल तजवीज केली आहे. त्याचा तपशील पुढे लिहिल्याप्रमाणे. ... ... मिलिटरी वर्क्स सिव्हिल वर्क्स... ४६८००० ५८२४००० १००६८००० ४४८२३००० ६२९२००० ५४८२१०००