पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४६ ) रांत खर्चण्यास काढली होती, तीपैकी दुष्काळपीडितांस मदत ह्मणून रुपये २३४२३० खर्च झाले, आगगाड्यांकडे रुपये ८४७९५० व रुपये ७७९३१० पाटबंधा-यांवर खर्च झाले. बाकी रुपये २३१६८१ आगगाड्यांचे जमेचे खात्यास नेण्यांत आले; कारण, दुष्काळ निवारणार्थ उपयोगी पडण्यासारखे दोन मोठाले आगगाड्यांचे मार्ग कंपन्यांकडून करविण्यांत आले अहेत. त्या साली रुपये ६८२१७०० कर्ज फेडण्याकडे लावण्यांत आले. १८९४-९५चे बजेटांत या कामांपैकी दुष्काळपीडितांस मदत व पाटबंधान्यांसाठी ह्मणून रुपये ४२३८००० दाखल करण्यांत आले आहेत. कांही आगगाड्यांचे रस्ते सरकार या रकमेतून किंवा कर्ज काढून न बांधतां चालू जमेंतून खर्च करून बांधतात. हे रस्ते लहान लहान प्रांतिक उपयोगाचे असे असतात व हा खर्च प्रांतिक कामांत दाखविण्यांत येतो. सन १८९१।९२ साली हैदराबाद-उमरकोटरस्ता तयार करण्यासाठी याप्रमाणे खर्च करण्यांत आला होता. सन १८९२।९३ सालीं असे प्रकारच्या आगगाड्यांवर रुपये ३३९४८७० खर्च झाला. १०. पब्लिक वर्क्स खात्याचे संबंधाने पुढे स्वतंत्र भागांत माहिती देण्यांत येईल. येथे फक्त त्या खात्याचे जमाखर्चाचे संबंधाने मात्र सांगण्याचे आहे. या खात्यांतील खचात तीन पर्याय असतात ; चालू उत्पन्नांतून आगगाड्यांचे रस्ते करण्याबद्दल वर उल्लेख केलाच आहे. शिवाय कर्ज काढून त्यांतून कामें होतात त्यांत त्यांस क्यापिटल (भांडवली) अकाउंट ह्मणतात, व त्याबद्दल एक रोव्हिन्यु (जमेचें) खाते असते. येथे या शेवटचे खात्यासंबंधानेच सांग- ण्याचें आहे. सन १८९१६९२ साली या खात्यांत निवळ खर्च रुपये ३१५८६४० आला, ह्मणजे जमा रुपये १९९३८०४६० व खर्च रुपये २०२५३११०० झाला. यांत स्टेटरेल्वेपासून थोडा फायदा झाला ; मदत दिलेले कंपन्यासंबंधे बहुतेक जमाखर्चाची बरोबरी झाली. व्याजाबद्दल हमी घेतलेल्या कंपन्यासंबंधानेच काय तो खर्च पडला होता. १८९४-९५चे बजेटांत खर्च रुपये २२५३८३००० व जमा रुपये २०४०८४००० होईल असा अजमास धरला आहे. वाढ बहुतेक हुंडणावळीचे भावामुळेच झाली आहे. हुंडणाव- ळीचे पैसे पडत नसते तर खर्च वजा जाऊन सरकारास चांगली बचत राहती. पाट-बंधाऱ्याचे कामाचे दोन वर्ग आहेत. मेजर ह्मणजे जी कर्ज काढलेले