पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४५) ग्याची कल्पना मूळ लार्ड नार्थब्रुक यांचे कारकीदीत निवाली. त्यांनी असें ठर- विले की दुकाळ वारंवार पडणारच व ते पडत जातील त्या त्या वळी कर्ज का- ढल्यापासून नुकसान होतें ; त्यासाठी शिलक राहील त्या साली तीतून पूर्वीचें कर्ज कमी करावे, किंवा उत्पन्न करणारी पब्लिक वर्क्सची कामे करावों, व दुका- स पडेल त्या वेळी असे प्रकाराने काढून ठेवलेले रकमेपर्यत जरूर पडेल तितकें कर्ज काढावें. या ठरावांतील बेत लोर्ड लिटनसाहेबांचे कारकीर्दीत रंगारूपास आला व त्याप्रमाणे अंमल सुरू झाला. सन १८७३ पासून १८७८ सालापर्यंत दुष्काळप्रीत्यर्थ साडेसोळा कोट रुपये खर्च झाला होता व ही सालेही मोठी अनर्थाची होती. या वेळचे व पूर्वीचे दुष्काळांचे अनुभवावरून सरकारांनी असा कयास केला की दहा वर्षांत या कामासाठी साडेपंधरा कोटि रुपये ला- गत जातील, व या रकमेच्या तजावेजीसाठी दरसाल निदान दीड कोटि रुपये दुष्काळ निवारणार्थ ह्मणून काढून ठेवले पाहिजेत. यासंबंधाने असा ठराव कर- यांत आला की दरसाल दीड कोटि रुपयांची रक्कम बजेटांत दाखल करीत जावी व तिचा विनियोग कर्ज फेडण्याकडे करावा किंवा त्या साली पाटबंधारे व आगगाड्यांसाठी कर्ज काढण्याचे असल्यास तितकें नवीन कर्ज कमी काढावें; झणजे या व्यवस्थेचा परिणाम असा होईल की, दुष्काळ पडल्या वेळी कर्ज का- ढावे लागले तरी पूर्वीपेक्षा बोजा जास्त होणार नाही. या व्यवस्थेत पुढे थोडा पालट करण्यांत येऊन असें ठरले की, ही रक्कम नुसती कर्ज कमी करण्याकडेच न लावतां तीपकों कांही रक्कम दरसाल दष्काळी प्रांतांत आगगाड्या व पाटबंधारे करण्याकडे खर्च करीत जावी, ह्मणजे त्यांचे योगाने दुष्काळाचे वेळी लोकांचे संरक्षणास चांगली मदत होत जाईल. ही रक्कम दुष्काळचा खच नसेल असे साली काढून ठेवण्याची आहे. दुष्काळ असेल त्या साली पीडित लोकांस मदत दे- ण्याकडे तिचा खर्च पहिल्याने होण्याचा आहे. हा खर्च नसेल किंवा तो भागन शिलक राहील ती रक्कम मार्गक्रमणाचे मार्ग सुधारण्याकडे किंवा कर्ज फेडण्याकडे लावण्याची आहे. या फंडापैकी आगगाड्या करणे त्या सर- कार स्वतः करते किंवा कंपन्यांस मदत देऊन करवितें, व त्यासंबंधाने त्या कंपन्यांस नुकसानी झाल्याबद्दल ती रक्कम सरकार या फंडांतून देते. सरकारास पैशाची टंचाई झाली ह्मणजे या कामांवर खर्चण्याची रकम फारच कमी कर- ण्यांत येते असें अनेक वेळां झालें आहे. सन १८९१।९२ साली व गेले दोन साली या कामांसाठी सर्व नियमित रक्कम देण्यांत आली होता. १८९४-९५ साली खर्चाचे अडचणीमुळे पाट-बंधारे व आगगाड्यांवर खर्च करण्याची रकम कम करण्यांत आली आहे. सन १८९१।९२ साली दीड कोटि रुपये रक्कम या सद- १०