पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टक्के करण्यात आले आहे, व त्यामुळेही आणखी वचत होईल. १८९४-९५ चे बजेटांत व्याजाबद्दल खर्चाची रक्कम रुपये ४६११४००० धरली आहे व जमेची रक्कम रुपये ८:६८००० धरली आहे. टीपः-विलायतेस सोन्याचें ( पौंड ) नाणे चालते तेव्हा तेथें कर्ज काढलेले पौंड नाण्याचे आहे. या देशांत काढलेले रुपयाचे नाण्यांत आहे. पोष्ट तारहपीस व टांकसाळी-हीं व्यापारी त-हेची खाती आहेत. पोष्टाचा हिंदुस्थानांत होत असलेला खर्च उत्पन्नाने भरून येतो, परंतु विला- यतेंत होत असलेला स्टोर-सामान पुरवठा व सब्सिडीज् वगैरे खर्च त्या खात्या- वर पडल्यामुळे तूट येते. तारखात्याचा व टांकसाळीचा खर्च उत्पन्नांतून भागतो. १८९३ सालापर्यंत लोकांस चांदी देऊन रुपये पाडून घेतां येत असत ते बंद कर- प्यात आले. हल्ली टांकसाळीचा उपयोग नाणे व पैसे पाडण्यासाठीच होत आहे. १८९४-९५ चे बजेटांत खर्चासाठी रुपये ६८१००० आकारण्यांत आले आहेत, व जमा रुपये ६७७००० धरली आहे, ह्मणजे निवळ खर्च रुपये ४००० आहे. या तिन्ही खात्यांचा सन १८८१-८२ सालांत खर्च रुपये ३१४५८४० होता, परंतु सन १८९१-९२ सालांत ही स्थिति पालटून खर्चच जाऊन शिलक रुपये १४६५४८० राहिली होती, व सन १८९२-९३ त रुपये २३१३२०० राहिली. टपाल व तारहपिसाचा स्वतंत्र भागांत विचार होईलच. सन १८९१-९२ साली टांकसाळीपासून जमा रुपये २००४६० व खर्च रुपये ९७१०९० झाला होता. चालू सालेचे बजेटांत या तिन्ही खात्यांची जमा रुपये २६५६५००० व खर्च रुपये २५९५८००० धरला आहे. सिव्हिल खातीं या सदरांत एकंदर नऊ खाती येतात त्यांबद्दल खर्च किती झाला तें खालील पत्रकावरून दिसून येईल. यांपैकी मोठाले खात्यांबद्दल सविस्तर वर्णन वेगळे भागांत आलेच आहे. पोलिटिकल खात्यासंबंधाने एवढेच सांगण्याचे की या सदरांत पोलिटिकल एजंट वगैरेंचा खर्च येऊन शिवाय पोलिटिकल कैदी व आश्रयास रहाण्यास आलेले संस्थानिक लोकांचा खर्च येतो शेवटचे सदरांत जत्रा, प्रदर्शनें, वनस्पतीचे शास्त्रीय बाग व वळू पाळणे, सिंकोनाचे वागही येतात; तसेंच सेन्सस (मनुष्यगणती) व सरव्हे ह्मणजे पहाण्या व शेतकी खाते व मिटिआरालाजिकल खाते यांचाही समावेश या सदरांतच होतो.