पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४२) टपालासाठी बसविलेला कर हे येतात. सन १८९१-९२ सालाचे पूर्वीचे दहा वर्षांत वाड २१६ टक्के आहे. हे कर जमीनवावांचे मानाने वाढत जातात. कस्टम खात्याचे उत्पन्न सन १८८१-८२ नंतर कमी होत गेलें, कारण सन १८८२ साली अयात व निर्गत मालावरील जकात वहुतेक कमी करण्यांत आली होती. चालू साली ती फिरून बसविण्यांत आली आहे. आकारलेले कर-कस्टमचे उत्पन्नाप्रमाणेच आकारलेले कराची स्थिति आहे. गेले १० सालांत या करांत दोन वेळा मोठे फरक कण्रयांत आले, यामुळे उत्प- नांत विशेष फरक झाला; तेव्हां पूर्वीचे उत्पन्नाशी तुलना करण्यास जागा नाही. फारेस्ट खात्याचे ( जंगलखात्याचे ) उत्पन्नांतही सारखी वाढ आहे. सन १८८१-८२ पासून १८९१-९२ र्पयत तें दुप्पट वाढले आहे. रेजिस्ट्रेशन-नोंदणी-खातें:-१८९१-९२ चे पूर्वीचे १० सालांत वाढ ८४ टक्के झाली आहे. खंडण्यांत फारसा फरक होण्यासारखा नाही. काय वाढ झाली आहे ती बहुतेक ब्रह्मदेश खालसा झाल्याने झालेली आहे. नेमणुका व कंपेनरलेशन :-मोठाल्या नेमणुका मुंबई इलाख्यांतच बहु- तेक आहेत, व त्यांचा संबंध बहुतेक पेशवाईशी आहे. कंपेनसेशनची रक्कम मिठागर बंद करण्यांत आले त्यावदल व देवस्थानासंबंधाच्या जमिनी खालसा करण्यांत आल्या त्याबद्दल, बहुतेक आहे. यांचा संबंध जमेच्या सदरांशी अस- ल्यामुळे निव्वळ उत्पन्न काढतांना त्या वजा करण्यांत येतात. खर्च-आतां खर्चाचे वाबींबद्दल विचार करण्याचा आहे. व्याज-यांत पहिले सदर व्याजाचे आहे. त्यांत गेले दहा सालांत सुमारे १७ टक्के खर्च कमी झाला आहे. गेले तीन सालांत सरकारी कर्जाचे व्याजाचा दर कमी करण्यांत आला आहे व सरकारांतून कर्जाऊ दिलेले रकमांचे व्याजा- पासून जमेची रक्कम वाढत आहे. रुपयांत काढलेले कर्जाचे व्याज सन १८९१-- ९२ साली रुपये ४१६८६२२० होते व पौंडांत काढलेले कर्जाचे व्याज पौड- ३८०३१५९ होते व त्याचे हुंडणावळीबद्दलचा खर्च रुपये १६५१५६९० त्या साली आला होता. एकंदर व्याज रुपये ९६२३३५०० झाले त्याची वाटणी सा- धारण कर्जखातीं चाळीस टक्के व पब्लिकवर्क्सखाती ६० टक्के अशी हिशेबी आकारण्यांत येते. चालू साली चार टक्के व्याजाचे कर्ज होते त्याचे व्याज ३३