पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४१) लोकप्रिय झाल्या आहेत ते त्यांशी व्यवहार करणारे लोकांचे संख्येचे वाढी- वरून दिसून येत आहे. सन १८-१८२ साली दिस्ट्रिक्ट सेव्हिंग ब्यांकेत पैसे ठेवणारे १८९७७ होते व सन १८९।९२ साली पोष्टाचे सेव्हिग व्यांकेंत पैसे ठेवणारांची संख्या ४६३४५३ झाली. ठेवांचे रकमेचे संबंधाने पाहतां, सन १८८१।८२ साली ती स्पये ७२७८९२० होती व ती सन १८९१।९२ साली रुपये ७०५९३१६९ झाली, ह्मणजे नऊपट वाढली. सन १९९३ साल- अखेर पैसे ठेवणारांची संख्या ५२०९६७ व ठेवींची रक्कम रुपये ७८१८७७२७ अशी होती. तसेच टपालखात्याकडे हे काम गेल्याने पूर्वी ज्या वर्गास हा संचयाचा मार्ग प्राप्त नव्हता त्यांस तो प्राप्त झाल्याने संचय करण्याची वहिवाट पडत चालली आहे. ८. जमीन बाब-वरील पत्रकांतील पहिली बार जमीन वाव आहे. दरशं- भर रुपये उत्पन्नापैकी चाळीस रुपये या बाबीचे आहेत. त्या बाबींचे उत्पन्न फार सावकाश वाढते, कारण जमीनवावेचे दराचे ठराव फार मुदतीचे झालेले असतात. सन १८८१।८२ सालापेक्षां सन १८९१।९२ साली हे उत्पन्न शेकडा सुमारे ७ टक्के वाढले आहे. अफू-या बाचेि खालोखाल अफू ही उत्पन्नाची वाव आहे. या वाबीचें उत्पन्न गेले दहा वर्षात कमी झाले आहे. सन १८८१-८२ सालापेक्षां सन १८९१-९२ साली ते २१ टक्के उतरले. मिठाचे उत्पन्नात वाढ आहे. मिठावरील कर सन १८८२ साली सर्व देशभर एकसारखा करण्यात आला; त्यामुळे पहिल्याने उत्पन्न काही कमी झाले, परंतु कर कमी झाल्याने खपही वाढला, त्यामुळे तूट बहुतेक भरून येत होती, तों सन १८८८ साली, खर्चाचे अडचणीमुळे कर मणास दोन रुपये होता तो अडीच रुपये करण्यांत आला, व त्यामुळे आतां उत्पन्न सन १८८२ पेक्षा वाढले आहे. सन १८८१-८२ पासून एकंदरीत १८ टक्यांची वाढ आहे. मादक पदार्थावरील कराचे उत्पन्न एकसारखे वाढत आहे. साधारण गेले दहा वर्षांत वाढ ४७ टक्के झाली. ही वाढ कराचा दर वाढविल्याने व चांगला चंदोबस्त ठेवल्याने झाली आहे. सांगणचे उत्पन्नही तसेच सारखे वाढत आहे. सन १८९१-९२ पूर्वी १० वर्षांतील वाढीचे प्रमाण ०६६ टक्के आहे. प्रांतिक करांत, लोकल फंड, पंजाब व नार्थवेस्ट प्रांतांतील परवारी कर, व मद्रास व मध्यप्रांतांतील तसेच प्रकारचा कर, बंगाल्यांतील रस्ते, शाळा व