पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१४०) लाख रुपये, पंजाब बहा लाख, मध्यप्रांत आठ लाख, खालचा ब्रह्मदेश साहा लाख व आसाम पांच लाख रुपये. सरकारी पैला खासगी व्यक्ती किंवा व्यक्तींचे समुदायाचे फायद्यासाठी खर्च करण्यांत येऊ नये; तसा खर्च करणे तो हिंदु- स्थानसरकारांनी ठरविलेले नियमांस किंवा मान्य केलेले तत्वांस अनुसरून असला पाहिजे. प्रांतिक सरकारांस काही बाबतींसाठी सरकारी पैसे कर्ज देण्यास परवानगी देण्यांत आली आहे, त्याशिवाय इतर कामासाठी कर्ज देणे झाल्यास परवानगी घेतली पाहिजे. तशीच परवानगी शिलकेची रक्कम सरकारी नोटींत किंवा दुसर प्रकारे व्याजी लावण्यासही घेतली पाहिजे. जमा व खर्चाचे बजेट (अंदाज ) करावे व खर्च त्यांत ठरविले रक्रमांचे आंत ठेवावा; दरम्यान एखादे बाबतीत जास्त खर्च करण्याचें जरूर झाल्यास, तो दुसरे एखादे सदरांसाठी दाखल केलले रकमेतून रक्कम वर्ग करून घेऊन त्यांतून करावा. हिंदुस्थानसर- कारांनी केलेले नौकरी, रजा, पेनशन, प्रवास वगैरेबद्दलचे नियम (सिव्हिल सव्हिसरेग्युलेशन्स ) पब्लिकवर्क्स खात्याचे कोड, अकाउंट कोड (हिशे. बाचे पद्धतीचे नियम ) वगैरे प्रांतिक सरकारांनी पाळिले पाहिजेत वगैरे. याप्रमाणे हिंदुस्थानांतील जमाखर्चाची पद्धति व कर वसविणे व त्यांचा खर्च करणे यांसंबंधाने चालू असलेली पद्धति व स्थानिक स्वराज्यपद्धति यांसंबंधाची थोडक्यांत हकीकत आहे. ७. रोविंग व्यांका येथपर्यंत देशाचे सांपत्तिक स्थितीशी संबंध असणारे व त्या स्थितीत फेरबदल करणारे काही कारणांचा विचार केला व कर वसवि- ण्याचे व वसूल व खर्च करण्याचे बाबतींत जो महत्वाचा फरक मध्यंतरी करण्यांत आला त्याबद्दल थोडक्यांत हकीकत दिली. आतां वर दिलेले पत्रकांती- ल बाबींचा विचार करण्यापूर्वी एकच बावतीचा-सेव्हिंग ब्यांकांचा-विचार करण्याचा राहिला आहे तो करून नंतर त्या बाबतींकडे वळू. सन १८८२।८३ त लहान ब थोर सर्व प्रकारचे शेतकरी लोकांस पेसासंचय करण्याची सवय व्हावी ह्मणून, स्टाक नोटी काढण्यात आल्या होत्या, परंतु सहा वर्षात अनुभव पाहतां लोकांस ती सोय आवडली नाही असें दिसले; तेव्हा त्या नोटी बंद करण्यांत आल्या. सेव्हिग व्यांकांचा मात्र प्रसार फार झाला आहे. सन १८३३ साली या व्यांका तीन इलाख्यांच्या शहरी स्थापन झाल्या व पुढे त्या पोटभागांतही स्थापन करण्यांत आल्या. सन १८८२ पासून पोष्टाकडे तें काम देण्यात आल्यापासून तर या पेढ्यांची फारच भरभराटी झाली आहे. या व्यांका चांगल्या चालू झाल्यावर पूर्वी दिस्ट्रिक्ट व्यांका होत्या त्या, इला- ख्याचे शहराबाहेरील ठिकाणच्या, बंद करण्यांत आल्या. या व्यांका किती