पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाही, हे फायदे होतील असा हिंदुस्थानसरकारचा अजमास होता; याशिवाय स्थानिक स्वराज्यव्यवस्था वृद्धिगत होउन राज्यव्यवस्थेचे कामांत युरोपियन व एतद्देशीय लोकांस मिळूनमिसळून काम करण्यास सवड व्हावी, व मुनसिपाल कारभाराची उन्नति होऊन लोकांस राज्यकारभारांत शिक्षण मि- ळावे, हा ही व्यवस्था करण्यांत एक हेतु होता. ह्या व्यवस्थेप्रमाणे पहिल्याने खर्चाच्या रकमा पांच वर्षांचे मुदतीने नेमून दिल्या होत्या. ती मुदत पुरी झा- ल्यावर सन १८७७ साली पूर्वीचे व्यवस्थेत सुधारणा करण्यांत आली ती अशी कों, पूर्वी फक्त खर्चाचीच खाती प्रांतिक सरकारांकडे वर्ग करण्यांत आली होती, त्याशिवाय या वेळी जमेच्याही काही बाबी यांचेकडे देण्यांत आल्या. याही प्रसंगी शर्ती ठेवण्यांत आल्या होत्या व त्या पूर्वीपेक्षाही राखतही होत्या. स्थानिक स्वराज्यव्यवस्था वाढविण्याचा जो मूळचा हेतु तो या प्रसंगी तसाच एका बाजूस राहिला. प्रांतिक जमाखर्चासंबंधाने तिसरा करार सन १८८२ साली लार्ड रिपन यांचे कारकीर्दीत झाला, व त्यांनी आपले नेहमींचे उदार वर्तनक्रमात अनुसरून या खेपेस पूर्वीचे व्यवस्थेत पुष्कळ सुधारणा केली. त्यांनी प्रांतिक सरकारांकडे वर्ग केलेले खर्चाची व जमेची तोंडमिळवणी करण्यासाठी ठोक रकम न देतां हिंदुस्थानसरकारांनी आपले हाती ज्या जमेच्या बाबी ठेविल्या होत्या, त्या वावींचे उत्पन्नापैकी काही अंश प्रांतिक सरकारांकडे लावून दिला. कांही जमे- च्या बाबी सर्वस्वी वर्ग केल्या व कांहींचे उत्पन्नांत वांटणी ठरविली, व कांहीं खात्यांचे खर्चातही उभयतांची वाटणी ठरविली, व या उत्पन्नांतून न भागतां जी खर्चाची तूट उरेल ती भरून काढण्यासाठी जमीनवाव, जी हिंदुस्थान- सरकारांनी आपलेकडे राखून ठेविली होती, तिचेपैकी काही नियमित अंश देण्या- चे ठरविले. अफू, मीठ, कस्टम, खंडण्या,पोष्ट, टेलिग्राफ व टांकसाळ,कर्ज,आगगाड्या, लष्कर वगैरे खाती हिंदुस्थानसरकारांनी आपलेकडेच ठेविली होती; कारण स्वभाव- तःच हीं खाती प्रांतिक नव्हत. हे ठराव प्रांताप्रांतांशी वेगळाले रीतीने झाले, त्यांचा तपशील देण्याचे कारण नाहीं; मुंबईसरकारास जंगल, मादक पदार्थ, आकार- लेले कर, स्टांप व नोंदणी या बाबींचे उत्पन्नापैकी निमे भाग, प्रांतिक कर, किरकोळ खाती, बातें, मरीन, पोलीस, शाळाखातें, वैद्यकी खातें, स्टेशनरी व छाप- खाना, या खात्यांची जमा सर्व, तसेंच कस्टम, मीठ या वावींच्या किरकोळ जमा सर्व, व व्याज, पेनशन, किरकोळ व पब्लिकवर्स बाबींच्या जमेपैकी काहीं रकमा ह्या सर्व, मिळाल्या होला. या जमेनें न भागतां राहणारी तूट भरून येण्यासाठी जमीनवावेपैकी ५९.८२ अंश देण्यात आला होता. विशेष भयकंर