पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पौंड* रुपयास पेन्स. २३.१२६ १९.८९५ १६७३३ १४.०० " विलायतेंतील खर्च. हुंडणावळीची रक्रम. हुंडणावळीचा दर. साल. रुपये. सन १८७१-७२ १२३०४५९० १८८१-८२ ११७३७६८८ २४२१४९९० १८९१-९२ १५७१६७८० ६८२५९०९० १८९४-९५ १५६५७१०० ११३०७११०० सालचे वजेट.

  • विलायतेंतील जमेच्या रकमा वजा करून निव्वळ खाच्या या रकमा आहेत.

हिंदुस्थानचे उत्पन्न सन १८७१ पासून सरासरी सवाईनें वाडले आहे व खर्च पूर्वीपेक्षा ११ टक्के वाढला आहे. विलायतेंतील खर्च फारसा वाढला नाही. हुंडणावळीचा खर्च मात्र इतका वाढला आहे की सन १८९१-९२ साली नि- व्वळ उत्पन्नापैकी १३३ टक्के या कामास जाऊ लागले. चालू सालचे बजेटाचे मानाने पहातां २१२ टक्के जाऊं लागले आहेत. १८९४-९५ सोलचे बजेटांत या कारणामुळे तूट रु० २९२३१००० धरली आहे व तुटीसाठी हे बजेट करण्यापूर्वी आयात व निर्गत मालावरील जकाती, पूर्वी माफ करण्यांत आल्या होत्या, त्या बसविण्यांत आल्या आहेत. या जकातीबद्दल कायदा सन १८९४ साली मार्च माहिन्यांत झाला आहे. हे उत्पन्न धरून तुट रु. ३०१९००० आहे. ६. जमाखर्चाचे पद्धतीत सुधारणा-- या देशाचा राज्यकारभार खुद्द राणीसरकारांनी कंपनीकडून आपलेकडे व्यवस्था लावण्यासाठी, विलायतेहून एक फडणवीस पाठावल्याचे वर सांगितलेच आहे. ते येण्याचे पूर्वी खर्च फार वाढला होता व खजिन्यांत तूट येऊन खर्चाची टंचाई झाली होती, तेव्हां विल्सनसाहेबांनी सुरू केलेल्या सुधारणांत सर्व देशांतील खर्चावर हिंदुस्थानसरकारास फार सख्त देख- रेखीचा अधिकार दिला होता. कोणताही खर्च करणे झाल्यास हिंदुस्थानसर- कारची मंजुरी लागे व हुकमाप्रमाणे कर वसूल करणे, व ते मंजुरी देतील त्याप्र- माणे व देतील तितके रकमेचा खर्च करणे, एवढेच अधिकार स्थानिक सरका- रांकडे राहिले होते. असें प्रारंभी करणे जरूर होते; कारण सर्व ठिकाणी मुख्य ठिकाणचा अधिकार बरोबर बसल्याशिवाय तो वांटून देणे सोईकर झाले नसते. या व्यवस्थेचा परिणाम चांगला झाला नाही. स्थानिकसरकारे आपल्यास जरूर तितकी रक्कम मिळेल न मिळेल या कांक्षेने जास्तच रक्कम मागत, त्यांची नजर आपले अमलांतील राज्यव्यवस्था चांगले त-हेनें चालावी एवढ्यावरच असे त्या कामास खरा खर्च किती लागेल, व इतर प्रांतांच्या गरजा कशा आहेत, व घेतल्यावर जमाखर्चाची . ..