पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३३) लागते. इतर खात्यांतही देखरेख करणारे अंमलदार तिकडूनच आणावे लाग- तात. व्यापारवर्धनासाठी व दुष्काळापासून रक्षणाची कामे करण्यासाठी कर्ज काढावे लागते; व या कामी आजपर्यंत काढलेले कर्जापैकी दोनतृतीयांश कर्ज विलायतेतच काढलेले आहे. तसेंच कोळसा, लोखंड वगैरे इकडे विपुल मिळत नाहीत ते पदार्थ व लोहमार्ग, पूल, व लाकरी व आरमाराचे कामांसाठी लाग- णारे सामान युरोपांतून च आणेवावे लागते. याप्रमाणे लष्करी व इतर नौकरां- चा पगार व पेनशन व कर्जाचे व्याज व इतर युरोपियन सामान यावल सर्व पैसा विलायतेंत पाठवावा लागतो. तिकडील नाणे सोन्याचे व इकडील रुप्याचं आहे, व सोन्याचे मानाने रुप्याची किंमत उतरली असलेमुळे या बाबतींतील बोजा दिवसेंदिवस एकसारखा वाढत चालला आहे. ५. जमाखात अस्थैर्य येण्यास मुख्य कारणे दुष्काळ, लष्करखर्च, हुंडणावळ १ अफू ही आहेत. या देशांत दुष्काळ वारंवार पडण्याची भीति आहे व तो पडण्याचे बंद करणे जरी मानवी सामर्थ्याचे बाहेर आहे तरी, त्यापासून होणारे नुकसान व हाल कमी करणे शक्य आहे ; यासाठी दरसाल तशा कामाकडे कांहीं खर्च करण्यांत येतो. यासंबंधाने जास्त विस्ताराने पुढे सांगण्यांत येईल; येथे त्या विषयाचे फक्त दिग्दर्शन पुरे आहे. लष्करी खर्चाचे बाबतीत अलीकडे मोठ्या लढाया जरी थोड्याच झाल्या आहेत तरी, दरसाल सरहद्दीवर लहान लहान स्वान्या नेहेमी चालू असतात, व त्या स्वायांचा खर्च परस्पर भागत नाही. अफूचे उत्पन्न जरी इच्छित मर्यादेत ठेवता येते, तरी तिची किंमत चि- नांतील खपावर अवलंबून असते, व त्यामुळे ती वारंवार पालटते. त्या देशांत अफूची लागवड वाढत चालल्याने व इतर देशांतून तिकडे अफू जाऊ लागल्याने इकडील अफूचा खप कमी होऊ लागला आहे, व किंमतही उतरत चालली आहे. या कारणाने अफूचे उत्पन्न हे जमेस धोका बसविणारी बाब झाली आहे. शेवटची बाब ह्मणजे हुंडणावळ. पूर्वोक्त तीन नुकसानीच्या बाबतीत कांहीं तरी मोबदला किंवा समाधान मानण्यास जागा असते, परंतु हुंडणावळाचा खर्च असा आहे की त्याबद्दल मोबदला काही नाही; परतंत्र देशास ती निव्वळ नुक- सानीचीच बाब आहे. हे नुकसान गेले वीस वर्षांत फारच वाढत गेले आहे. पुढील पत्रकांत विलायतेत होणारा निव्वळ खर्च व त्यावरील हुंडणावळ यांचे आंकडे दिले आहेत, त्यांवरून गेले वीस वर्षांत या बाबतींतील खचात किती अं- तर पडले आहे ते दिसून येईल.