पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३२) कोणतेही देशाचे सांपत्तिक स्थितीचा विचार करतांना ज्या गोष्टींचा विचार करणे जरूर असते त्यांत, त्या देशांतील लोकसमाजांचे उदरनिर्वाहाचे मार्ग काय आहेत, व ते कसे चालतात, याचे निरक्षिण ही प्रधान गोष्ट आहे. या देशांत दोनतृतीयांश लोक शेतकी करून, व आणखी एकदशांश त्यांचेच संबंधाची कामें करून, ते सर्व जमिनीवर उदरनिर्वाह करितात. नउदशांश लोकवास्त खेडेगांवांत आहे व साधारण शहरांत राहणारे लोक एकंदर एक- पंचमांशही नाहीत. व्यापाराचें व बंद्याचे महत्व वाढले आहे ते इंग्रजी राज्य चालू झाल्यानंतरचें आहे ; तेव्हां बहुतेक सर्व वस्ती खेडगांवांत व कांहीं थोडी शहरांत अशी वाढली आहे. यासंबंधाने सांपात्तक दृष्टीने विचार करतांना दोन गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. त्या ह्या की, शेतकापासून संपत्तीचें वर्धन फार सावकाश होतें व हिंदुस्थानचे लोकांची स्थिति व विचार यांचा कल संप- त्तीचा अनुत्पादक रीतीनें खर्च करण्याकडे असतो. या देशांत हिवाळा बराच माफक असल्याने पोषाखाचा खर्च वगैरे कमी लागतो, तरी पर्जन्याची बरेच वेळा कमताई होते व तसे झाले झणजे देशांतील लोकसमाजाचे बरेच भागास हाल सोसाव लागतात, व त्यामुळे जमाखर्चाची तोंडमिळवणी डळमळू लागते. अलीकडे शेतकरी लोक काही कारखान्यांत वगैरे कामास लागतात, परंतु त्यांचा हेतु मुख्यत्वेकरून प्राप्ती होईल त्यापासून जमीनजुमला करावा हाच असतो. कारखाने व कलाकौशल्यें पूर्वीपेक्षा काही वाढली आहेत, परंतु त्यामुळे शेतकीवर उदरनिर्वाह करणारे लोकांचे स्थितीत फारच थोडा फेरवदल झाला आहे, वज- मिनी सोडून धंद्याकडे फारच थोडे लोक आकृष्ट झाले आहेत. सामाजिक स्थितांचे बरोबरच राजकीय स्थितीचाही विचार केला पाहिजे; कारण तिचा जमाखर्चाशी विशेष निकट संबंध आहे. बंडानंतर या देशाची स्थीरस्थावरता करण्यास खर्च पुष्कळ लागला व सन १८५७चे बंड मोडण्याचे खर्चाचीही पूर्वांची मोठी रकम होती. आठवे भागांत सांगितलेप्रमाणे आतां समराचे स्थान देशाचे अंतर्भागांतून सामंत प्रांतांत गेले आहे, तेव्हां त्या प्रां- तांचा बंदोबस्त करण्याचा व तेथें परशत्रूपासून रक्षणासाठी तयारी ठेवण्याचा खर्च पर्वीपेक्षा वाढला आहे. लष्करी खर्चासंबंधाने ही गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की, या देशाचे उष्ण हवेचे कारणाने युरोपिअन लोकांस कायम वरती करून येथे राहतां येत नाही व त्यामुळे सैन्यांत त्या लोकांची भरती करण्यास विलायतेसच जावे लागते व सेन्य उत्कृष्ट रीतीने शिक्षित व तयारीत ठेवण्या- साठीही विलायतेचे व इकडील युरोपियन सेन्याची नेहेमी अदलाबदल करावी