पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२७ ) १८८०-८१ १८८९-९० १८९०-९१ लायसेन्सटाक्स करांत दुरुस्ती झाली व नीळ व लाख यांवरील जकाती माफ झाल्या. १८८२-८३ पटवारी कर (वायव्यप्रांतांतील), व कापडावरील व आ- यात मालावरलि, जकात माफ झाली. मिठावरील कर कमी करून दोन रुपये करण्यात आला. माळवी अफूचे पेटीच्या पासाची दस्तुरी रु. ६५० करण्यांत आली. १८८६-८७ लायसेन्स टाक्स बंद करून प्राप्तीवरील कर वसविण्यांत आला. १८८८-८९ पेट्रोलियमवर ( ज्वालाग्राही तेलावर ) दस्तुरी बसली. मि- ठावरील दस्तुरी रु० २-८ मणी झाली. वायव्य प्रांतांत पटवारी कर फिरून बसविला. परकीय दारूवर व देशांतील बीर दारूवर जास्त कर बसला व माळवी अफूचे पेटीस दस्तुरी रु० ६०० झाली. १८९३-९४ आयात व निर्गत मालावर-कापडा शिवाय-जकात बसवि- ण्यांत आली. परदेशी कपड्यावर जकात व देशी कपड्यावर कर वसला. माळवी अफूचे पेटीवरील जकात आणखी ५० रुपये वाढली. येथपर्यंत कराचे वावतींत ज वेळोवेळी कायदे झाले त्यांबद्दल साधारण मा- हिती सांगितली. आतां जमेच्या व खर्चाच्या बाबती कोणत्या तें सांगून, त्यांब- हल साधारण विवरण करण्याचे आहे. सन १८८१-८२, १८९१-९२, १८९४-९५ सालांबद्दल जमाखर्चाचे पत्रक पुढे दिले आहे. या पत्रकांत दोन भाग केलेले आहेत, पहिल्या भागांत जमेची सदरें व त्या बाबतीसंबंधाने होत असलेला खर्च ही दाखविली आहेत. दुसरे भागांत कर्ज व नफा होणारे सार्व- जनीक कामावर खर्च झालेला पैसा व त्यापासून आलेलें उत्पन्न ही दाखविली आहेत. हिंदुस्थानाचे संबंधानें विलायतेत होत असलेले खर्चाचे पत्र या पत्रका- चै पुढे दिले आहे. या पत्रकांवरून खर्च किती व कोणते देशांत होतो तें दि- सून येईल. आणखी एक त-हेनें, ह्मणजे इंपीरियल (बादशाही) प्राव्हिन्शियल (प्रांतिक ) व लोकल ( स्थानिक ) यांसंबंधानें तपशीलवार जमा व खर्च कसा कसा होत आहे हे दाखविणे जरूर आहे. ती फोड या पत्रकांत न करतां स्वतंत्र रीतीने करण्यात येईल. १२९ पृष्ठावरलि जमाखर्चाचे कोष्टकांतील पहिले सदरांत १८९४