पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.. (१२८) जमेच्या खऱ्या बाबी दिल्या आहेत; त्या जमीनवाव वगैरे दहा आहेत. या बाबींपैकी पहिले आठांबद्दल विवेचन दहावे भागांत केले आहे, जंगलाबद्दल विवेचन स्वतंत्र भागांत येईल; नोंदणीबद्दल विवेचन पूर्वी झालेच आहे. दुसरे व तिसरे खान्यांत सन १८८१-८२ बद्दल जमाखर्चाची माहिती स्टाटिस्टिकल आब्स्ट्राक्टावरून दिली आहे. त्यापुढील दोन खान्यांत सन १८९१-९२ सालाबद्दल माहिती दशवार्षिक रिपोर्टातून घेऊन दिली आहे. शेवटील तनि खान्यांत सन १८९४-९५ साला- बद्दल जमाखर्चाचा अंदाज दिला आहे. १३० व १३१ पानांवर सन १८८१-८२ साली हिंदुस्थानासंबंधाने विलायतेस खर्च किती झाला त्याबदल माहिती दिली आहे ; ती स्टाटिस्टिकल आव्स्ट्राक्टावरून घेतली आहे. सन १८९४-९५ साली विलायतेस होणारे खर्चाचा अंदाज करण्यांत आला आहे त्याचा तपशील १२९ पानांतील कोष्टकांत शेवटील खान्यांत दिला आहे. या कोष्टकांतील प- हिले भागांत खऱ्या जमेच्या बावी दिल्या आहेत हे वर सांगितलेच आहे. दुसरे भागांत ज्या वाबी आहेत त्यांपैकी काही निव्वळ खर्चाच्याच आहेत व आगगाड्या वगैरे काही व्यापारी तन्हेच्या आहेत. शिक्षण शिवाय करून सिव्हिल खाती व लष्करी खातें यांबद्दल पूर्वी विवेचन झालेच आहे, शिक्षणाबद्दल पुढे ओघाने वर्णन येईल. दुष्काळफंडाबद्दल वर्णन कांहीं या भागांत व कांहीं पब्लिक व- सचे भागांत येईल. तिसरे भागांतील बाबी ह्या चालू जमाखर्चाच्या संबं- धाच्या नाहीत, परंतु सालांतील व्यवहाराचे पूर्ण ज्ञान होण्यास त्यांची माहिती असणे जरूर असते अशा त्या आहेत. या पत्रकातील बावतींचा विचार करण्या- पूर्वी इतर काही महत्वाचे गोष्टींचा विचार केला पाहिजे, तो करून नंतर या पत्रकांतील बाबतींचे संबंधाने विवेचन करण्यांत येईल. 17727, GENERAL KHED सार्वजनिक नर पलय खेड, (.)