पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

LIBRARY GENEAN (it (१२५) सार्वजनिक वाचनालय रखेड, (पुणे.) भाग नववा TVNoir फिनान्स-जमाखर्च. १. या भागांत हिंदुस्थानसरकारचे जमाखर्चाबद्दल विवरण करण्याचे आहे. सन १८५९ सालापर्यंत जमेच्या मुख्य बाबी-जमीनवाब, मिठावरील कर व अफूचे उत्पन्न, ह्या होत्या; व जमीनवाबींचे उत्पन्न इतर सर्व बाबतींचे जमेपेक्षा जास्त होते. या बाबींचे प्राप्तीची जी वाढ सालोसाल होत होती, त्या- पासून चालू खर्चाची तजवीज लागत होती, परंतु बंडाचे साली ही स्थिात पा- लटली. लढाईचा व स्वस्थता करण्याचा खर्च फार झाला व तो तसाच पुढेही चालू ठेवणे जरूर होते. शिवाय अशा प्रसंगास उपयोगी पडण्यासाठी पूर्वी पैशाच्या तजविजी करण्यांत आल्या नव्हत्या, त्यामुळे सरकारास पैशाचे संव- धाने फार पंचाईत पडली. त्या प्रसंगी जमा वाढविणे हे अगत्याचें होतें, ह्मणून आयात व निर्गत मालावरील जकाती वाढवून-कांही प्रकारचे मालावर २० टक्के व कांहीं मालावर १० टक्के, (यांतच कापडाचा समावेश होत होता) अशा बसविण्यांत आल्या. कंपनीचा अंमल चालू असतांना जमाखर्चाची पद्ध- ति विशेष व्यवस्थेशीर अशी. नव्हती व बंडानंतर राज्यव्यवस्थेचा खर्चही फार वाढला, तेव्हां सर्व बाबतींची व्यवस्था लावण्यासाठी विलायतसरकारांनी आपले फडणविशी दप्तराचे चिटणीस विल्सनसाहेब यांस त्याच सुमारास हिंदुस्थानांत फडणिशीचे कामावर पाठविले. या साहेबांनी एकाच वर्षांचा जमा- खर्चाचा अंदाज सादर केला व जमाखर्चाचे वावतीत सुधारणा करण्यास सुर- वात केली, तो त्यांचे नेमणुकीपासून एक वर्षांतच त्यांस मृत्यूने गाठले. या साहेबांचे कारकीदीत कस्टमची जकात कमी करण्यांत आली, व विलायतचे नमुन्यावर प्राप्तीवर कर बसविण्यात आला, व स्टांपाचे कायद्यांत महत्वाचे फरक झाले; त्यांत पावत्यांस व हुंड्यांस तिकिटे लावण्याचे ठरले. त्यांनी सुरू केलेल्या पद्धति पुढे चालू-राहून त्यांच्या पश्चात् चांगले स्थितीत आल्या आहेत. सालोसाल करांचे दरांत कसा फेरफार होत गेला व नवीन कर कसे बस- विण्यांत आले याची साद्यंत हकीकत देणे या पुस्तकांचे आकारमानाने शक्य नाहीं; साधारण सार्वत्रिक करासंबंधानें कांहीं ठोकळ गोष्टी थोडक्यांत देतो. १८६०-६४ नवीन कर बसविण्यात आले नाहीत. कस्टमची जकात व प्राप्तीवरील कर यांचे दर कमी करण्यांत आले.