पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

RENERO! 1/31/2, 4160). (१२४) आपण भरण्याची व तयार करण्याची परवानगी द्यावी, व हल्ली सैन्यांतील लोक विलायती लष्करी खात्यांतीलच घ्यावे लागतात तशी जरूर ठेऊ नये. त्यांचे ह्मणणे असें आहे की, हल्लींचे पद्धतीप्रमाणे विलायतेंतील व हिंदुस्थानांतील सैन्ये एक ठेविली व हल्लींप्रमाणे हिंदुस्थानावर खर्चाचा बोजा ठेवला तर पुढे हिंदुस्थानावर मोठा कठीण प्रसंग येईल. हिंदुस्थानसरकारास आपले सैन्यांत युरोपिअन सैन्यभरती करण्यास परवानगी दिली झणजे ते हल्लीचेपेक्षा कमी खर्चात, विलायतेस किंवा क्यानडा देशांत लोकभरती करतील व त्यापासून जो नफा होईल त्यांतून त्यांस जरूरीप्रमाणे जास्त सैन्य ठेवण्यास सांपडेल. सैन्यासंबंधानें हिंदुस्थानांत जो खर्च होतो त्यांत वाढ झाली आहे ती सैन्य वाढल्यामुळे व रशियाची या देशावर स्वारी होईल या भीतीनें वायव्यसरह- द्दीवर जी तयारी ठेवण्यात आली आहे त्यामुळे झाली आहे. याशिवाय त्या सरहद्दीचा इतर बाजूचे सरहद्दींचा बंदोबस्त करण्यासाठी ज्या लढाया कराव्या लागतात त्यांमुळेही मधून मधून लष्करी खर्चात वाढ होते. सैन्याची संख्या कशी वाढली आहे हे वर सांगितलेच आहे. वायव्येकडील सरहद्दीवर रशियाचे स्वा- रीचे कारणाने जी तयारी ठेवण्यात आली आहे, तिचा हिंदुस्थानाशी जितका संबंध आहे तितकाच विलायतेचे हिताशीही आहे. मध्यहिंदुस्थानांत रशिया जी कारस्थाने करीत आहे त्यांचा प्रत्यक्ष हिंदुस्थानाशी काही संबंध नाहीं, तो प्रश्न इंग्लंडचे राज्यकारस्थानाचे संबंधाचा आहे, तेव्हां रशियाचे वर्तनामुळे हिंदुस्थानांत जो जास्त खर्च ठेवण्यात आला आहे तो न्यायाने ह्मणजे विला- यतसरकाराने दिला पाहिजे. याप्रमाणे हिंदुस्थानाचे लष्करी खर्चासंबंधाने जे वादविवाद झाले आहेत त्यांचा आशय आहे. त्या वादविवादांतील विचारांची सरणी दाखवावी एवढाच हा सारांश देण्याचा हेतु आहे; एरव्ही त्याबद्दल साधारण सारांश देण्याचे मनांत आणले तरी एक वेगळा ग्रंथच होईल. सार्वज गक सम्बनाला खेड, (पुगे.)