पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२३) झाला. खर्च हिंदुस्थानावर घालण्यांत पुष्कळ तन्हेनें अन्याय होतो ; उदाहर- णार्थ, शिपायास शिक्षण देण्यासंबंधानें खर्च फार घेण्यात येतो. ईस्टइंडिया कंपनी पायदळ भरण्यासाठी व तयार करण्यासाठी माणशी सुमारे २५ पौंड खर्च करीत असे ; आतां पायदळाबद्दल माणशी सुमारे ६४ पौंड व घोडेस्वारावल माणशी सुमारे १३७ पाडै खर्च लागतो. या बाबतींतील खर्चही असे त-हेनें आकरण्यांत येतो की, त्यांत इंग्लंडाच्या इतर वसाहतींसाठी जे शिपाई तयार करण्यांत येतात, त्यांचेबद्दलही काही खर्च या देशावरचे खर्चात येतो; या देशाबाहेर ज्या लढाया करण्यात येतात त्यांबद्दल खर्च पुष्कळ वेळा या देशावर बसतो, परंतु या देशाचे कामासाठी विशेष मदत देण्यात आली तर तो सर्व खर्च पैसान्पैसा वसूल करून घेण्यात येतो. तसेंच हिंदुस्थानांत सैन्य आणण्या- साठी व येथून परत नेण्यासाठी आगवोटी बांधण्यात आल्या आहेत, त्यांतून सैन्य नेण्याआणण्यांत येते. या आगबोटींचा खर्च हिंदुस्थानावर घालण्यांत येतो. सुएझचा कालवा झाल्याने जरी पूर्वीपेक्षां भाडे कमी झाले आहे तरी वेगळी गलबतें ठेवल्याने सैन्य नेण्याआणण्याचा खर्च पूर्वीपेक्षाही पुष्कळ जास्त लागतो. याप्रमाणे सैन्यावद्दल खर्च आकारण्याचे संबंधाने हिंदुस्थानचे स्टेट- सक्रेटरी यांस विचारणा सुद्धा होत नाही; विलायतसरकारचे लष्करीखातें व फडणिशी खाते या दोन खात्यांत विचार होऊन रक्कम ठरते व ती हिंदुस्थान- सरकारास द्यावी लागते अशी स्थिति आहे. सैन्यासंबंधानें खर्च आकारण्याचे दरांत फेरफार झाला पाहिजे ह्मणून लार्ड नार्थब्रुकसाहेबांनी सुचविले आहे. तो असा की, हल्ली लोक तयार करण्याबद्दल जे माणशी साडेसात पौंड घेण्यांत येतात ते पांच पौंड घ्यावे, नान-इफेक्टिव खर्चात जी रक्कम सन १८७० पासून १८८४ पर्यंत वाढत गेली आहे तिचेपैकी निम्मे विलायतसरकारांनी द्यावे, कारण त्या वेळी खर्चात वाढ झाली ती विलायतेंतील सैन्यांतील वरिष्ट दर्जाचे अंमलदारांचे हक्क खालचे दर्जाचे अंमलदारास विकत घेतां येत असत, ती वहिवाट बंद करण्यांत आल्याने झाली होती. हिंदुस्थानाकडून लष्कराबद्दल जसा सर्व खर्च विलायतसरकार घेते तसा इतर बहुतेक वसाहतींकडून घेत नाही, त्यांस विलायतसरकार सैन्य फुकट देते. तसेंच विलायतसरकार, विलायतेचे राजकारणांसाठी लढाया करतें, त्यांत हिंदुस्थानचा संबंध नसतां, त्यांचा खर्च पुष्कळ प्रसंगी या देशावर लादतें. सर चार्ल्स डिल्के यांनी ही स्थिति सुधारण्यास उपाय सुचविला आहे तो असा की, हिंदुस्थानसरकारास सैन्यांत जे युरोपिअन लोक लागतात ते आपले ..