पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२२) सून या देशाचा पैशासंबंधाने तोटा झाला आहे; तो असा की तेव्हांपासून सैन्याचे खर्चावद्दल पैसा पूर्वी ज्या रीतीने आकारण्यांत येत असे त्याहून दुसरे रीतीने आकारण्यांत येऊ लागला व तो आकारतांना त्या खर्चापासून हिंदुस्थान- चा फायदा आहे किंवा नाही व या खर्चात हिंदुस्थानचा संबंध आहे किंवा नाही याचा विचार होईनासा झाला. विलायतेंतील सैन्यांत पगार व वढती यां- संबंधानें पूर्वी ज्या पद्धति होला त्या पुढे बदलण्यांत आल्या; त्या फरकांचा हिंदुस्थानाशी कोणतेही प्रकारचा संबंध नाही, किंवा त्यापासून या देशास फायदा- ही कोणते प्रकारचा नाही, तरीही त्या सुधारणांमुळे जो जास्त खर्च लागू लागला त्याचाही अंश हिंदुस्थावर घालण्यात येतोच. दोन्ही सैन्ये एक करण्यांत आल्या- वर खर्च कोणते आकाराने घेण्याचा त्याबद्दल पहिल्याने ठराव सन १८६१ साली झाला, तेव्हां हिंदुस्थानांत नौकरीस असलेले प्रत्येक गोरे शिपायावद्दल १० पौंड व नौकरीवर नसून पेनशनांत असलेले शिपायांबद्दल दरमाणशी साडेतीन पौंड घ्यावे असे ठरले. त्याच वेळी हिंदुस्थानचे स्टेटसेक्रेटरींनी तकरार केली होती. या व्यवस्थेचा परिणाम असा झाला की, नौकरींतून गेलेले लोकांबद्दल खर्च (नान-इफेक्टिव्ह खर्च) पूर्वी ६० हजार पौंड होता, तो त्या साली २२५ हजार पाँडांवर आला. ही व्यवस्था सन १८७० सालापर्यंत चालली. पुढे या खर्चा- बहल नवीन नियम झाले त्यांत हिंदुस्थानाने पेनशनाबद्दल रक्कम देण्याची तिची रास करण्यांत आली व त्या मानाने दरसाल देण्याची रक्कम ठर- विण्यांत आली. ह्या व्यवस्थेनेही खर्चाची पुष्कळ वाढ झाली. त्या वेळीही हिंदुस्थानचे स्टेटसेक्रेटरींनी तकरार केली, परंतु विलायतसरकारांनी ती मनास आणली नाही. अजूनही हा अन्याय नाहीसा करण्यासाठी काही तजवीज करण्यात आली नाही. नौकरीवर असलेले लोकांबद्दल जी रक्कम घेण्यांत येते तिचेबद्दलही अशीच तकरार आहे. ही रक्कम घेण्यात येते ती शिपाई निवडून नेमणूक करणे व शिकवून तयार करणे यांबद्दल घेतात. या खर्चास इफेक्टिव्ह चार्ज असें ह्मणतात. सन १८६९ सालापर्यंत दरइसमास पौंड घेण्यात येत असत; पुढे नक्की खर्च होईल तो व्यावा असे ठरले. प्रमाणे खर्च सालोसाल घेण्यात येत आहे, परंतु वाजवीपेक्षा फाजील रक्कम घेण्यात येते अशी तकरार आहे. याबद्दल हिंदुस्थानसरकारांनीही पुष्कळ वेळा तकरारी केल्या, परंतु सन १८७९ सालापर्यंत त्याचा काही उपयोग झाला नाही ; त्या साली विचार होऊन पूर्वीचे खर्चाचे बाबतींतील तकरारी विलायतसरका- रांनी कबूल केल्या व पुढे कसे प्रकाराने खर्च घ्यावा याबद्दल विचार करण्यासाठी एक कमिशन नेमले, परंतु अखेरीस त्यांत त्या प्रश्नाचा विचार न होता त्याचा अंत १० त्या-