पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१२०) त्याचेकडे असतो. याशिवाय साधारण प्रसंगी तोफा वागविण्यास उपयोगी पडतील अशा लहान आगबोटी २० ठेवण्याच्या आहेत. त्यांपैकी काहीं तयार झाल्या आहेत व कांहीं होत आहेत. समुद्राची सर्व्ह (पहाणी) करण्याचे कामही चालू आहे. या खात्याचे जमाखर्चाची माहिती खाली दिली आहे. १८९११९२ १८९४।९५ अंदाज जमा रुपये २२२४१४० १३८२००० ४३६५५३० ३८२४००० विलायतेंत पौंड १३३४४७८ १८४१००० हुंडणावळ रु. ५७९५१० खर्च हिंदुस्थानांत १३१५००० ६२८९५१० ६९८०००० लोकमतः-आतां लष्करी खात्यासंबंधाने लोकांच्या तकरारी आहेत त्या सांगण्याच्या आहेत. वाद दोन मुद्यांवर आहेतः (१) सैन्याची संख्या जरूरीशिवाय ज्यास्त वा- ढविली आहे. (२) लष्करी खर्च विलायत व हिंदुस्थान या दोन्ही देशांत जास्त होतो. सैन्याचे संख्येसंबंधाने असें ह्मणणे आहे की, सन १८८५ साली में सैन्य वाढविण्यांत आले, ते वाढविण्याची जरूर नव्हती. त्या वेळी असलेलें सैन्य लडाईचा प्रसंग आला असता, त्या कामास पुरून देशाचे बंदोबस्तास जरूर तितकें सैन्य शिलक राहण्यास पुरेसें होतें. लार्ड लिटनसाहेबांचे कारकीर्दीत लष्करासंबंधाने विचार करण्यासाठी कमिशन नेमलें होते, त्या कमिशनाने असा अभिप्राय दिला आहे की, पर शत्रूपासून देशाचे संरक्षण करण्यास, देशांत स्वस्थता ठेवण्यास, व संस्थानिकांवर दाव राखण्यास असलेले सैन्य पुरेसें आहे; अफगाणिस्थानचे अमिराबरोबर, किंवा रशियाबरोबर किंवा दोघांबरोबर मिळून लढाई करण्यास ६० हजार सैन्य लागेल व बाकी राहिलेलें सैन्य देशांत प्रसंग पडल्यास पुरेसे होईल, असा अभिप्राय दिला आहे. शिवाय या कमिशनने रि- पोर्ट केल्यानंतर वायव्येकडील सरहद्दीवर आगगाड्या झाल्या आहेत, किले वगैरे बंदोबस्ताची कामे झाली आहेत, देशांत तारायंत्र व आगगाड्या यांचा सर्वत्र प्रसार झाला आहे, सैन्यास नवीन त-हेची हत्यारे देण्यांत आली आहेत, यामुळे सैन्याचे सामर्थ्य वाढले आहे व सर्व देशांतील एकंदर सैन्याचा वाटेल तिकडे पूर्वीपेक्षा जास्त उपयोग होऊ शकतो. कमिशनने जे