पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११९) टीप-(१) इफेक्टिव्ह खर्चीत सैन्याचे नौकरीचा पगार, भत्ता, रजेचा पगार शिक्षणाचा खर्च, सामानाचा खर्च, कपड्यालत्त्याचा खर्च, वाटखर्च वगैरे येतात (२) नान-इफेक्टिव्ह खर्चात बक्षिसें, पेनशनें, नेमणुका वगैरे येतात. आरमार. प्राचीन काळी ईस्ट इंडिया कंपनी ही हिंदिमहासागरांत आरमार ठेवीत असे. ते हिंदुस्थानच्या किनाऱ्याचा बंदोबस्त ठेवी व त्याने युरोपिअन राष्ट्रांचे आरमाराशीही पुष्कळ वेळ टक्कर मारली होती, व चीन व इराण या देशांवि- रुद्ध झालेले लढाईचे वेळी तें कामगिरीवर होते. हे आरमार सन १८६३ साली विलायतचे सरकारी आरमारांत सामील करण्यात आले व पुढे हिंदु- स्थानचे परशत्रूपासून संरक्षणाचे काम विलायतचे आरमाराने करावें असें ठरलें, व या आरमाराकडून न होण्यासारखे कामांसाठी, उदाहरणार्थ लष्कर व सामान व पुरवठा नेणे, वंदरचा बंदोबस्त राखणे, व चांचेपणा व गुलामांचा व्यापार बंद करणे वगैरे कामांसाठी, हिंदुस्थानसरकारांनी मुंबईचे व मदा- सचे स्थानिक सरकारचे हाताखाली जरूर तितके लोक ठेवावे असे ठरले. हिंदु- स्थानाकडून विलायतसरकारास सहा लाढाउ गलबतें नौकरीस देण्याबद्दल सत्तर हजार पौंड देण्यांत येत असत, व वीस हजार पौंड सहखाते ठेवण्या- साठी देण्यात येत असत. दोघां स्थानिक सरकारांकडे ठेविलेलें आरमार एक होऊन तें हिंदुस्थानसरकारांनी आपले हाती घेतले. यांत अंमलदारांच्या नेमणुका स्टेटसेक्रेटरी करीत, व इंजनियर वगैरेच्या नेमणुका हिंदुस्थानसरकार करीत असत. त्यानंतर या लोकांचे पगार व हुद्दे विलायतचे आरमाराप्रमाणे करण्यांत आले, व त्यांची पायरी विलायतचे आरमाराचे खालची असें ठर- विण्यांत आले. अंमलदारांच्या नेमणुका करण्याचा अधिकार व्हाइसराय- साहेबांस देण्यात आला. हिंदुस्थानचे आरमाराचा डायरेक्टर मुंबई येथे असतो, व त्याचा डेपुटी कलकत्ता येथे असतो. वायव्येकडील बंदोबस्ताची जशी नवीन पद्धत ठरविण्यांत आली, तशीच बंदरें व किनारे यांचे बंदोबस्ताचे संबंधानेही व्यवस्था करण्यांत आली आहे. त्याप्रमाणे सात टारपेडो बोटी, दोन टरेट गलबतें, दोन तोफाच्या बोटी ठेव- ण्यांत आल्या आहेत, व त्यांवर तोफांचा पुरवठाही करण्यांत आला आहे; ह्यांचेवर अंमल हिंदुस्थानासाठी देण्यांत आलेले आरमारावर मुख्य असतो