पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११६ ) प्रांतांतील सैन्य; व मद्रासचे जनरलाचे ताव्यांत त्या इलाख्यांतील व ब्रह्मदेशां- तलि सैन्य व मुंबईच्या जनरलाचे ताव्यांत मुंबई, बलुचिस्थान, सेंट्रलइंडिया व राजपुतान्याचे भागांतील अशी सैन्ये राहतील. कमांडर-इन्चीफ यांचेकडे को- णतेही प्रांताचे सैन्याचे काम न राहतां त्यांची सर्व सैन्यांवर देखरेख राहील. वर सांगितलेले सरकारी सैन्याशिवाय हैदराबादची तैनाती फौज, मध्य हिंदु- स्थानांतील रिसाला, खैबर रायफल्स व आतां नवीन तयार होत असलेली इंपी- रिअल सव्हिस टुप्स ( बादशाही नोकरीची फौज ) ही सैन्ये आहेत. या चार सैन्यांची व्यवस्था हिंदुस्थानसरकारचे परराज्यसंबंधी खात्यांतून होते. लष्करी खात्याचे संबंधाची खाती ह्मणजे सामान पैदा करणारे खाते ( कमि- सारियट खातें), वैद्यकी खातें, पशुवैद्यकी खातें, दारूगोळा करणारे खाते वगैरे आहेत; परंतु याबद्दलची हकीकत विस्तारभयास्तव गाळणे भाग आहे. अली- कडे सैन्याचे संबंधाचें इमारतखातेही वेगळे करण्यांत आले आहे. सन १८५८ पासून बराकी, इस्पितळे व शिपायांचे सोईचे इतर कामांवर ३५ कोटि रुपये खर्च झाला आहे. सैन्य वाढवून व इतर तजविजी करून, जमिनीवरून परशत्रूपासून रक्षणाची तजवीज करण्यात आली आहे, तशीच समुद्रावरील शत्रूपासून रक्षण करण्याचे संबंधानेही सन १८८५ सालानंतर चांगली तजवीज करण्यात आली आहे. या विशेष बंदोबस्ताचे कामांवर सन १८९१-९२ साली रुपये ६०४८४८० खर्च झाला; व सन १८८५-८६ पासून एकंदर खर्च सुमारे साडेतीन कोटी रुपये झाला आहे. तीन इलाख्यात असलेली वेगळालीं स्टाफकोरें मोडून सर्व हिंदुस्थानची स्टा- फकोरची पलटण एकच केली आहे. एतद्देशीय लष्कर सुधारण्याचे संबंधानेही अलीकडे फार विचार करण्यात आला आहे. एतद्देशीय लोकांचे सैन्याची काम- गिरी अलीकडे थोड्या वर्षांपर्यंत देशांतले देशांतच होत होती, व त्या कामास योग्य असे लोक सैन्यांत भरण्यात येत असत; अलीकडे त्यांचे समर विजयाचें स्थान पालटून ते या देशाचे हद्दीचे बाहेर गेले आहे. यापुढे युद्धप्रसंग येण्याचे ते वायव्येकडील सरहद्दीवरच येणार, व आतां त्याच दिशेकडे बंदो- बस्ताची तजवीज चालली आहे. दक्षिणी किंवा मद्रासी किंवा मुसलमान लोक यांणी सैन्यावरोवर हिंदुस्थानाबाहेरील देशांत जरी आजपर्यंत काम-