पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

BENETA! 119-234, KHED. (११७) गिरी बजाविलेली आहे तरी त्या देशांतील हवापाणी पठाण, रजपूत, गुरखे, व बलूची वगेरे लोकांस जास्त चांगले मानवतें; तेव्हां आतां लष्करांत लोक ठेवणे ते उत्तराहिंदुस्थान किंवा नेपाळचे खोऱ्यांतून भरावे असे ठरविण्यात आले आहे.आणखीही पूर्वीचेपेक्षां लष्कर भरण्याचे वावे- तीत एक साधारण फरक झाला आहे तो असा की, सन १८५९ सालापासून पलटणीत सर्व जातीचे लोक एके ठिकाणी ठेवण्याची वहिवाट होती, (ती डोंगरी लोकांचे सैन्य भरलें त्या वेळी त्यांस मात्र लागू करण्यांत आली नव्हती; त्या लोकांची पलटण वेगळीच ठेवण्यात आली होती,) आतां जातवार वेगळाल्या पलटणी तयार करण्याचे ठरले आहे, व बंगाल व मुंबई येथे वेगळाल्या जातींची वेगळाली पलटणे भरण्याचे कामही सुरू झाले आहे. तसेच लांब मुदतीच्या रजा देउन लोक शिलकी ठेवण्याचीही पद्धति अमलात आणण्यात येत आहे. आतां महत्वाचे गोष्टींपैकी व्हालंटियर लोकांचे पलटणीसंबंधाने सांगण्याचे राहिले आहे. खासगी लोकांस लष्करी शिक्षण देऊन त्यांस तयार करण्याची वहिवाट सन १८६० साली सुरू झाली. सन १८९१-९२ साली या व्हालंटि- यर सैन्यांत लोक २७००० होते व त्यांत २३००० कामत तयार होते. कल- कत्ता येथील व्हालंटियर पलटणाने माणपूरचे लढाईत कामागिरी केली आहे. एकंदर सैन्याची संख्या ठोक आंकडयाने वर सांगितलीच आहे. आतां सन १८९२-९३ साली कोणते प्रकारची किती होती याबद्दल माहितीची मुख्य सदरें सांगण्यांत येत आहेत. युरोपिअन सैन्य-तोफखान्यांत १३३१२ व रिसाल्यांत ५६७९ व पायबळ ५३७१३ असे आहे. एतद्देशीय फौज-तोफ- खान्यांत ३८११, सापर्स व मायनर्सात ३८२५, रिसाल्यांत २३४२७ व पाय- दळांत ११३६९२ अशी आहे, व यांशिवाय इरेग्युलर्स १४००० आहेत. पुढील पत्रकावरून या सैन्याबद्दल किती खर्च येतो तें दिसन येईल. NATIVA सार्वजनिक यान्त्रवालय खेड, पुणे.) (FOON REN