पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११५) जावा. या सूचना अमलांत आल्या व त्याप्रमाणे सैन्य तयार करण्यांत आले तेव्हां त्यांत युरोपिअन सैन्य ६२००० व नेटिव १३५००० असें झालें. पुढे सन १८७९ सालांत लष्कराचे युद्धसामर्थ्य कमी न होतां संख्या किती कमी क- रितां येईल याबद्दल विचार करण्यासाठी एक कमिशन नेमण्यांत आले होते. त्याचे सूचनेप्रमाणे बंगाल व मद्रास येथील सैन्यांचे मुख्य सेनापतींच्या जागा कमी करू- न सर्व सैन्य हिंदुस्थानचे मुख्य सेनापतांचे ताव्यांत असावे असे नुकतेच ठरले आहे; व त्याबद्दलचा कायदा सन १८९३ साली पार्लमेंट सभेत पास झाला आहे. तो ठराव अमलात आणण्याची तयारी चालू आहे. त्या कायद्यांतील मुख्य मुद्याच्या गोष्टी अशा आहेत की, प्रांतिक कमांडर-इन्चीफच्या जागा कमी व्हाव्या, व त्यांचे अधिकार गव्हर्नर जनरल यांचे पसंतीने कमांडर-इन्चीफ है अंमलदार नेमतील त्यांचेकडे असावे;हिंदुस्थानचे कमांडर-इन्चीफचा अधिकार सव हिंदुस्थानभर चालावा, मुंबई व मद्रास येथील गव्हरनरांस सेनेसंबंधाचा अधि- कार राहण्याचा नाही, तो सर्व गव्हरनर जनरल व कौन्सिल यांणी चालवावा, व प्रांतांतील सैन्यावरील मुख्य अमलदार प्रांतिक कौन्सिलाचे सभासद असण्याचे नाहीत वगैरे. त्या कमिशनाने सुचविल्याप्रमाणे सैन्यांतील काही लोक त्या वेळी कमी करण्यांत आले होते, परंतु पुढे लागलीच सन १८८५ त लढाईची गडबड दिसू लागल्यामुळे व हिंदुस्थानचे बंदोबस्ताचे संबंधानें नवीन व्यवस्था अमलांत आणण्याचे ठरल्यामुळे सैन्याची संख्या पुनः वाढविण्यांत आली. या वेळी १०६६० युरोपिअन सैन्य, २१२०० नेटीव सैन्य असें ज्यास्त वाढविण्यांत आले. सन १८९२-९३ अखेर सैन्यांत युरोपिअन सैन्य ७४०३१ व नेटिव सैन्य १४४७५५ असे होते. या संख्येत नेटिव्ह सैन्यावरील गोरे अंमलदार १६५६ यांचा समावेश झाला आहे. चवथे वुइल्यमचे कायद्याप्रमाणे सैन्याचे मुख्य गव्हरनर जनरल व कौन्सिल हे आहेत. लष्कराचे व्यवस्थेचे संबंधाने अधिकारी हिंदुस्थानचे कमांडर-इन्ची- फ हे आहेत. आजपर्यंत मुंबई व मद्रास इलाख्यांची सैन्ये वेगळी होती व हिंदु- स्थानचे कमांडर-इन्चीफ यांचा प्रत्यक्ष अधिकार बंगाल व उत्तरहिंदुस्थान येथील सैन्यावर होता. आतां मुंबई व मद्रास येथील सैन्य तेथील कमांडर इन्चीफ यांच्या जागा कमी झाल्यावर, हिंदुस्थानचे कमांडर- इन्चीफ यांचेच अमलाखाली राहतील. सर्व सैन्याचे चार विभाग करण्यांत येण्याचे आहेत व प्रत्येक विभागावर एकेक मेजर जनरल राहतील. पंजारचे जनरलाचे ताब्यांत पंजाबचें सैन्य व सरहद्दीवरील सैन्य राहील; बं- गाल प्रांतांतील जनरलाचे ताव्यांत बंगाल, आसाम व वायव्य व अयोध्या