पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११४) आग आठवा. लष्कर व आरमार. या भागांत हिंदुस्थानांतील लष्कर व आरमार यांची हल्लींची स्थिती कशी आहे हे सांगण्याचे आहे ; व विषयप्रवेशासाठी प्राचीन स्थितीची थोड- क्यांत माहिती देण्यांत येत आहे. सन १६८१ साली इंग्रजांची बंगाल्यांत काय ती फौज २० शिपायांची होती; त्याच सुमारास मद्रासेकडे एत्तद्देशीय शिपाई नोकरीस ठेवण्यास सुरवात झाली होती. सैन्याची वाढ होत होत सन १८८१-८२ साली संख्या ६०००० युरोपिअन व ११०००० एत्तद्देशीय शिपा ई अशी झाली होती. सन १८९१-९२ अखेर युरोपिअन फौज ७३००० व नेटिव फौज १४७५०० होती. हल्लींची लष्कराची पद्धत सन १८५९ साला- नंतर चालू झालेली आहे. सन १८५६ साली युरोपिअन फौज ३८००० व नेटिव फौज ३४८००० होती, व त्याशिवाय संस्थानिकांचे खर्चाने ठे- वलेली तैनाती फौज होती. युरोपिअन सैन्यापैकी दहा हजार पायदळ हे कंपनी- चे अंमलदार विलायतेत तयार करून पाठवति व बाकीचें सैन्य विलायतेंतील सैन्यापैकी हिंदुस्थानांत नौकरीसाठी दिलेले असे. बंगाल, मद्रास व मुंबई या प्रांतांतील सैन्यावर त्या त्या प्रांतांतील सेनाधिपतीचा अधिकार असे, परंतु विलायतसरकाराकडून आलेले सर्व सैन्यावर, तें नौकरीस कोणतेही प्रांतांत असले तरी, वंगालची सेनापती,ज्यास हिंदुस्थानचा मुख्य सेनापती असें नांव असे त्याचा अधिकार असे. बंगालचे सर्व नेटिव सैन्य व मुंबईपैकी काही पलटणे, ही बंडांत सामिल झाली होती; तेव्हां पुढें सैन्याची भरती कसे प्रकारे करावी व त्यांत युरोपिअन शिपायांची संख्या किती असावी, याबद्दल विचार करण्या- करितां एक कमिशन नेमण्यांत आले होते; व त्या कमिशनाने सुचविलेले नि- यमाप्रमाणे हल्लींपर्यंत सैन्याची व्यवस्था आहे; फक्त किरकोळ बाबतींत फरक झाला आहे. त्या कामिशनाच्या सूचनांपैकी महत्वाच्या सूचना अशा होत्या की तोफखान्यावर सर्व युरोपिअन शिपाई असावेत; सर्व किल्ल युरोपिअन सै- न्याचे हाती असावेत, व युरोपिअन व नेटिव शिपायांचे प्रमाण बंगालचे सैन्यां- त एक युरोपिअन शिपायास दोन नेटिव शिपाई व इतर इलाख्यांत एकास तीन पेक्षा जास्त असू नये; हिंदुस्थानासाठी युरोपिअन सैन्य वेगळे ठेवण्यांत न येतां विलायतेंतील सैन्यापैकीच काही भाग या देशांत नौकरीसाठी आणीत