पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १०९) करण्यांत येते. तुरुंगांत चांगले वर्तणुकीचे कैद्यांस वार्डर नेमण्याची वहिवाट आहे. वेगळाले प्रांतांतील तुरुंगांत भिन्न भिन्न प्रकारची वहिवाट सुरू आहे ती मोडून सर्व तुरुंगांत एका नमुन्यावर वहिवाट करण्यासाठी एक कायदा १८९४ साली झाला आहे. हद्दपार करण्याचे शिक्षेचे कैदी अंदमान बेटांत पोर्ट ब्लेअर येथे पाठविण्यांत येतात. इतके लांब पाठविण्याचे कारण असे आहे की, गुन्हेगारांस गुन्हा के- ल्यास परदेशवास भोगावा लागेल ही भीति रहावी व गुन्ह्याचे ठिकाणापासून लांब नेऊन ठेऊन वर्तन सुधारण्यास त्यांस सवड द्यावी. या देशांत कैदेत रहाण्यापेक्षा त्या ठिकाणी कमी त्रास होतो अशी कैद्यांची सर्वसाधारण समजत झालेली आहे असें सरकारास समजले व असे होण्याचे कारण असे दिसून आले की त्या ठिकाणी कैद्यांस थोडी जमीन देऊन घर बांधण्यास परवानगी मिळते व मोठे सुखाने रहाण्यास सांपडते, अशा बातम्या तेथे राहून आलेले कैद्यांकडून इकडे पसरलेल्या होत्या. या बाबतीत विशेष चौकशी करण्यासाठी एक अंमले- दार नेमण्यांत आला होता, त्याने अशा सूचना केल्या आहेत की जन्मठेपे- शिवाय इतर कैद्यांस तिकडे पाठवू नये व तिकडे गेल्यावर पहिल्यानें कैद्यांस थोडा सक्तीचा जाच असावा व कारागिरीचे वगैरे कामावर असलेले कैद्यांस बक्षिसे देण्यांत येत असतात ती बंद व्हावी. त्यांनी आणखी असे कळविलें की थोडे मुदतीचे कैदी तिकडे गेल्याने त्यांचे वर्तनांत विशेषसा फरक होत नाही, परंतु ते तिकडील स्थितीचा चांगलेपणा मात्र इकडे वर्णन करति फिरतात; बक्षिस दिल्याने त्या लोकांस स्वतंत्रपणे रहाण्यास परवानगी मिळाल्यावर जरूरीपुरते पैसे मिळतात इतकेंच नाही, तर आपले घरी पाठविण्यासही पैसे उरतात व त्यामुळे तिकडील स्थितीचे संबंधानें इकडे गैरसमज मात्र होतो. ह्या हरकती होण्यासाठी त्यांनी वर लिहिलेले उपाय सुचविले. अंदमान वेटांत सन १८९२ साली ११३५६ कैदी होते त्यांपैकी शेकडा ७१ जन्मठेपेचे होते. नेहमी गुन्हे करणारे लोकांस वेगळे बेटांत ठेवण्यात आले होते. या सर्व कैद्यांत पोट भरून स्वतंत्र रहाणारे इसम २९२५ होते. सन १८८१-८२, १८९१-९२ व १८९२- ९३ सालांत हिंदुस्थानांत तुरुंग किती होते, व त्यांत कैदी किती असत, त्यांस खर्च किती लागे, याबद्दल तपशील खाली दिला आहे. कैद्यांची संख्या पूर्वीपेक्षा आतां वाढलेली आहे. त्यांत बायकांच्या संख्येची मात्र वाढ झालेली नाही. कैद्यांचे मृत्यूचे प्रमाण सन १८८१ पेक्षां अलीकडे पुष्कळ कमी होत गेलें आहे, व हें कैद्यांचे मरणाचे प्रमाण देशांत मृत्यूचे प्रमाण जे पडते, त्यापेक्षां पुष्कळ कमी आहे. याचे कारण असे आहे की, तुरुंगांत औषधाची व शुश्रूषेची व्यवस्था