पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(११०) फार चांगली असते. पूर्वी कैद भोगलेले लोक फिरून तुरुंगांत येण्याचे प्रमाण सन १८८१ साली शेकडा १७ होते, तें सन १८८१ साली १२ वर आले. तसेंच प्रमाण अजूनही आहे. कैदी कामावर लावण्यासंबंधाने पहातां असें दिसते की, सन १८९१-९२ साली शेकडा अडतीस कैदी कारखान्यांत कामावर लाव- लेले होते. बाकीचे कैदी तुरुंगांतच किंवा वागेचे कामावर लावण्यांत आले होते. जे जिन्नस साधारण भोवतालचे गांवांत होत नाहीत, अशा त-हेचे जि- नसांचे कारखाने तुरुंगांत असतात. काही तुरुंगांत छापण्याचेही काम शिकवि- ण्यांत येते. बरेच प्रांतांत कैद्यांचे पोटगीचा खर्च त्यांचे मजुरीचे किंमतीतून निघतो. वायव्य प्रांत व मद्रास या प्रांतांत कैद्यांचे मजुरीचे उत्पन्नाचें प्रमाण फार थोडें आहे. तुरुंगांची व त्यांतील कैदी लोकांची संख्या व तुरुंगांसंबंधी व कैद्यांचे पोटगी- संबंधी खर्च याबद्दल माहितीचे कोष्टक ( स्टाटिस्टिकल् आव्स्ट्राक्टावरून ). तुरुंगांची संख्या सेंट्रल. १८१ ५२४ मदततुरुंग ९६६६१ १८८१-८२ १८९१-९२ १८९२-९३ ३४ जिल्ह्याचे तुरुंग २०६ १८२ २३८ ५२७ दररोज तुरुंगांत कैदी असत त्यांची सरासरीची संख्या ९१६१५ ९३३५७ तुरुंगांतील कैद्यांचे पोटगीचा व देखरे- खीचा खर्च रु. ४८१९८२१० ५३९३९२१० ५७६३०५८० दरकैद्यास खर्च किती येतो ...रु.... ५२-९-९ ५८-११-० ६०-८-० पैकी खाण्याचाच खर्च २७-७-० २४-१२-० २७-०-० दररोज असलेले कैद्यांत सरासरी दरहजारी मृत्यूचे प्रमाण ४२ ३० ३६ कैद्यांपैकी पूर्वी शिक्षा झालेले किती होते.. .पुरुष... १७-९ १२६ स्त्रिया... ९.१ रेफॉर्मेटरीची ( सन्मार्गप्रवर्तकस्थानांची) पद्धत या देशांत चांगलीशी प्रचा- रांत आलेली नाही, तरी या शाळा वाढत जात आहेत. बंगाल्यांत दोन, मुंबईस एक, व वायव्य प्रांतांत एक अशा चार शाळा आहेत, व त्यांत अनुक्रमें ४९८,१०५ व १२८ अशी शिक्षा झालेली मुलें होती.