पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०४) .. अलीकडे गांव पोलीस व डिस्ट्रिक्ट पोलीस यांचा संबंध सुधारून गांवचे पहारेक-यांची स्थिति सुधारावी, यासंबंधाने स्थानिक सरकार व हिंदुस्थानसर- कार यांचे प्रयत्न चालू आहेत. या लोकांस गांवची जमीन मुषाहिन्याबद्दल देण्याची वहिवाट असे ती मोडून वायव्य प्रांतांत नक्त पगार देण्याचे सुरू केले आहे ; तसेंच अयोध्या प्रांतांतही पगार देण्याचे सन १८९२ सालापासून सुरू झाले आहे. या दोन्ही प्रांतांत चांगले काम करणारे लोकांस बक्षिसादो- खल कांही रकम देण्याची वहिवाट आहे. वंगाल प्रांतांत गांवपोलिसाची स्थिति सुधारण्यासाठी सन १८९२ साली कायदा करण्यांत आला आहे. गांवपोलि- साची नेमणूक गांवचे पंच करीत असत, व तो अधिकार या कायद्यावरूनही त्यांचेकडेसचे ठेवण्यांत आला आहे, परंतु त्यांनी केलेल्या नेमणुका जिल्ह्याचे आधिकारी यांनी पसंत कराव्या असें ठरविले आहे. हेच अधिकारी त्यांचा पगार व संख्या किती असावी हे ठरवितात. या गांवकामगारांची नेमणूक जिल्हाधि- पतींनी करावी असे ठरविण्याचा हेतु असा आहे की, चांगले इरामांची नेमणूक व्हावी व दिस्ट्रिक्ट पोलिसांनी त्या लोकांस सरवराईचे नौकरासारखें समजू नये. मुंबई इलाख्यांत माग काढण्याची वहिवाट बंद झाली तरी, गांवचे जागेल्यां- च्या नेमणुकी व त्यांस दिलेल्या जमीनी ह्या कायम ठेवण्यांत आल्या आहेत. डिस्ट्रिक्टपोलीस हे पोलीस प्रथमतः लार्ड कार्नवालिस यांनी १७९२ साली सुरू केले. त्यापूर्वी वसुलाचे काम करणारे जमीनदारच गुन्हे पकडण्याचे काम करीत असत. त्या साली तें काम जमीनदारांकडून काढून जिल्ह्याचे अधिका- यांकडे सोपविण्यात आले व त्यांचे हाताखाली त्या कामासाठी दरोगे नेमण्यांत आले. पुढे वायव्य प्रांतांतही हीच व्यवस्था सुरू करण्यांत आली. मद्रास इलाख्यांत प्राचीन पद्धत चालू होती व गांवचे मुख्य गुन्हेगार पकडून तहशीलदाराकडे पाठवीत असत. मुंबई इलाख्यांतही तशीच पद्धत चालू होती. पुढे जिल्ह्याचे अधिकाऱ्यांचे इतर काम वाढत गेल्यामुळे त्यांचे हातून पोलिसचे काम होत नाहीसे झाले तेव्हां पुढे पोलीसचे काम वेगळे अंमलदारांकडे देण्याचे ठरले. डि- स्ट्रिक्ट पोलीसचा हल्लींचा नमुना सर चार्लस नेपिअर यांनी पहिल्याने सिंध प्रांतांत आयलंड देशांतील पोलीसचे धर्तीवर चालू केला , व यांनी या लोकांस कांही युद्धकलेचे शिक्षण देण्यासही प्रारंभ केला. नेपियरसाहवाचे नमुन्यावर पोलिसाची व्यवस्था हळू हळू सर्व हिंदुस्थानांत सुरू झाली. हल्ली प्रत्येक प्रांतांत या खात्याचा मुख्य इन्स्पेक्टर जनरल असतो. जिल्ह्यांत पोलीस कोठे किती ठेवावे व त्यांनी गुन्हे पकडणे, व गुन्हेगारांस न्यायासनापुढे आणणे, ही कामें कशा रीतीने करावी, याबद्दल मुख्य हुकमत