पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१०१) व . प्रकारची दुसरी एक सूचना आहे ती अशी की, प्रत्येक जिल्ह्यांत असिस्टंट कलेक्टर व डेपुटी कलेक्टर असतील त्यांपैकी निमे लोकांकडे माजिस्ट्रेटी काम सोंपवावें व ते जिल्हाजज्जाचे हाताखाली द्यावे व बाकीचे निम्मे अंमलदारांनी मुलकी काम करावें. दुसरे प्रकारची एक सूचना आहे ती अशी की, सबार्डिनेट जज्जांकडील स्थावराचे व हक्कसंबंधाचे वगैरे भानगडीचे दावे काडून जिल्ह्याचे मुख्य ठिका- णचे कोटींकडे द्यावे व त्यांचेकडील हे काम कमी होईल त्याचेबद्दल त्यांचेकडे त्या तालुक्यांतील दुसरे वर्गाचें माजिस्ट्रेटी काम सांगावें; जिल्ह्याचे ठिकाणी मोठे व भानगडीचे स्थावराचे व हकसंबंधाचे दावे चालविण्यासाठी एक कोर्ट असावें, त्यांत चार अथवा पांच जज असावेत त्यांपैकी दोन सनदी नौकरींतील असून तीन बिनसनदी नौकरीतील असावे; हल्ली हायकोटीत पाठ आहे त्याप्रमाणे या जजांनी दोघ-दोघांनी किंवा तिघांनी एके ठिकाणी वसून मुकद्दमे चालवावे; यांचे ठरावावर कायद्याचे मुद्या- शिवाय इतर करणांसाठी अपील असूं नये; पक्षकारांनी विनंति केल्यास या कोर्टानी कज्जाची हकीकत हायकोर्टासे कळवून त्या कोर्टाचा कायद्याचे मुद्यासंबं- धाने अभिप्राय घ्यावा. ज्या कज्जांत अपीले ठेवले नाही अशांत हायकोर्टीस खालील कोर्टाचे ठराव तपासून पाहण्याचा अधिकार असावा. पहिले वर्गाचे माजिस्ट्रेटाचे अधिकारांतील गुन्ह्याची चौकशी एक किंवा दोन असिस्टंट किंवा डेपुटी कलेक्टर यांनी करावी व त्यांनीच सेशन कोर्टास खटले कमिट करावे. न्यायखात्यांत सुधारणा झाली पाहिजे किंवा कसे यासंबंधाने सन १८९४ सालचे कांग्रेसमध्ये प्रेसिडेंट मि. वेव यांनी जे भाषण केले त्यांतील थोडा उतारा येथे देतो व त्यानंतर कांग्रेसमध्ये जे या बाबतीत ठराव करण्यांत आले ते देतो. मि. वेब ह्मणाले की:-" कायदे चांगले असणे जितकें अवश्यक आहे, त्याच- प्रमाणे त्यांची अंमलबजावणी योग्य रीतीने होणे हेही अवश्यक आहे. यासाठी मुलकी आणि फौजदारी हे दोन अधिकार एकाच मनुष्याच्या हातांत असतां कामा नये. मुलकी अंमलदारांस लोकांशी मिळून मिसळून वागावे लागते; नाना- तन्हेच्या गोष्टी ऐकाव्या लागतात; न्यायाधिशा वर्तन यापेक्षा अगदी निराळ्या तन्हेचे असले पाहिजे; त्याणे आपल्यासमोर येतील तेवढ्याच गोष्टी पाहिल्या पाहिजेत व त्यांवरच आपला निकाल दिला पाहिजे. हे दोन्ही गुण अगदी भिन्न आहेत व याकरितां या दोन्ही कामी भिन्न भिन्न माणसांची नेमणूक झाली पाहिजे. जूरीचा प्रश्न अशांतलाच आहे. जूरी एखादे वेळेस गुन्हेगार सोडून देते येवण्याकरितां ती वाईट ह्मणन उपयोग नाही. नव्याण्णव गुन्हेगार सुटले तरी