पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१००) आतां कलेक्टर व त्याचे असिस्टंट हे राज्यकर्ते आहेत व राज्याचे सुस्थिती- साठी त्यांचे महत्व लोकांस उघड दिसण्यासारखे ठेवले पाहिजे, व त्यांचेबद्दल लोकांचे मनांत वचक राहण्यासाठी त्यांस माजिस्ट्रेटी व मुलकी आधिकार ठेवले पाहिजेत, ही एकदेशी विचारसरणी जरी मान्य केली तरी, ते अधिकार खालचे माजिस्ट्रेट, जे एतद्देशीयच असतात, त्यांचेकडे ते मुलकी अधिकारांस जोडून ठेवण्याचे काही कारण नाही. ल्या अधिकारापासून त्यांचे महत्व वाढ- वून ठेवल्याने ब्रिटिश राज्याचे पायास मजवुती येते असे नाही; फक्त त्यांचे- कडे इतर कामें फार असल्याने न्यायाचे काम मात्र बरोबर होत नाही व लोकांस त्रास भोगावा लागतो. मामलेदारांकडे तर इतकी कामें आहेत की, अमुक एक काम त्यांचेकडे नाही असे दाखविणेच कठीण आहे, तेव्हां त्यांचे हातून न्यायाचें काम बरोबर न होणे हे स्वाभाविकच आहे. एकंदरीत न्यायाचे व मुलकी काम एका अंमलदाराकडे असणे इष्ट नाही. आतां तसे दोन्ही अधिकार एका अंमलदाराकडे असणे इष्ट नाही ही गोष्ट नुकताच हाउस आफ ला सभेत वादविवाद झाला त्यांत हिंदुस्थानचे स्टेट- सेक्रेटरींनी व एका माजी स्टेट सेक्रेटरींनी कवूल केली, तेव्हां आतां त्याबद्दल वाद राहील असे वाटत नाही. या प्रश्नासंबंधानें ऐतिहासिक माहिती इंडिया मासिक पुस्तकाचे जुलई सन १८९३ चे अंकांत आहे ती पहावी. ही व्यवस्था अमलांत आणण्यासंबंधाने काय काय तजविजी केल्या पाहि. जेत, ह्याबद्दल सरकार स्वतःच विचार करू लागल्याशिवाय निश्चित होणार नाही. कारण जिल्ह्या-जिल्ह्यांत मामलेदार, माजिस्ट्रेट, सवाार्डनेट जज, असिस्टंट व डेपुटिकलेकटर यांस किती काम असते, हल्ली माजिस्ट्रेटी काम करणारे अधि- कारी वर्गाकडून तें काम निघाले तर त्यांचे बाकीचे काम किती अंमलदारांकडून होईल, व त्यांपैकी फक्त न्यायाचेच कामावर ठेवण्यास किती अंमलदार सांप- डतील, किंवा तितके कमी केले व दुसरे न्याय करणारे अंमलदार नेमले तर पूर्वीचे खर्चात किती नेमतां येतील, हे पाहण्यास जी माहिती पाहिजे ती सरकाराशिवाय इतरांस दुष्प्राप्य आहे. लोकांस फक्त सुधारणेची इष्ट दिशा मात्र दाखवितां येईल. या बावतींत दोन प्रकारांनीही सुधारणा अमलांत आणणे शक्य आहे असे दाखविण्यांत आले आहे. जिल्ह्यांतील कांहीं तालु- क्यांचे मामलेदार कमी करावे व त्यांचे पगाराचे रकमेतून जास्त सबाडिनेट जज नेमावे, व सर्व माजिस्ट्रेटी काम सबार्डिनेट जज्जांकडे सोपवावें ; मामले दार कमी केल्याने काही अडचण होईल ती लहान तालुक्याचे काम त्याचे शेजारचे मामलेदाराकडे सांगून दूर करावी, अशी एक सूचना आहे. . याच