पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९९) कामगारांस कायद्याचें ज्ञान मूळ कोते असते व त्याचा त्यांस सारखा व्यासंग ठेवण्यास सवडही नसते. राज्यकर्त्यांकडून अन्यायाचरण झाले तर त्याचे निय- मन न्याचाधिशांकडून होण्याचे आहे, व अशी व्यवस्था जेथें जारी आहे, तेथे लोकांत स्वातंत्र्यप्रियताही जास्त असते. राज्यकारभार करणा-या अंमल- दारांचे कृत्यांचा न्याय करण्याचे काम जर त्याच वर्गाचे अधिकाऱ्यांकडेस असले, तर रयतेचे हक्कांचा सांभाळ बरोबर होत नाही. प्राचीन काळच्या एत- द्देशीय राज्यव्यवस्थेत सर्व कामें एकाच अधिकाऱ्याकडे असत हे खरे, परंतु त्याच कारणामुळे लोकांतील स्वातंत्र्यप्रियता नाहीशी होऊन ते परावलंबी झाले, तरीही त्या वेळी राजा व प्रजा हे उभयतां एकदेशीय व एक धर्माचे असले कारणाने राज्यकर्त्यांचे वर्तनास काही अंशी तरी आळा पडे; ती बंधनें परकीय राज्यकर्त्यांचे अमदानीत असत नाहीत, यासाठी इंग्रजी अमदानीत न्यायाचे कोर्टास पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे व मुलकी व न्यायाची कामें वेगळाले अंमलदारांकडे दिल्याशिवाय घडणार नाही. या व्यवस्थेचे विरुध्द असे सांगण्यात येते की, इंग्रज सरकारचे राज्य कायम रहाण्यास हल्ली जिल्हाधिपतीस जे अधिकार आहेत ते तसे कायम ठेवले पाहि- जेत व सर्व प्रकाराने ते खरे राज्यकर्ते आहेत असे लोकांस वाटण्यासारखी त्यांची स्थिति राखली पाहिजे; व सनदी लोकांस न्यायाचे अधिकार देण्यापूर्वी मुलकी खात्यांत त्यांनी काम केलेच पाहिजे; कारण त्याशिवाय त्यांस लोकांची व री- तिरिवाजांची माहिती होत नाही. यासाठी जिल्ह्याचे अंमलदारांस हल्ली असलेले फौजदारी अधिकारही असले पाहिजेत. यासंबंधाने विचार पाहतां असे दिसते की, जिल्ह्यांचे मुख्य अधिकारी स्वस्तः फौजदारी काम फारच थोडे करतात. या अधिकाऱ्यांनी काम न चालविल्यामुळे जर त्यांचे महत्वांत कांहीं अंतर पडले नाही, तर आतां पुढें तें काम त्यांनी आपले एका असिस्टंटास सांगितल्यानेही त्यांचे स्थितीत बदल होणार नाही; व त्यांस इतर काम फार झाल्यामुळे, त्यांचेकडील फौजदारी काम काढून घेतले तर त्यांचे महत्व कमी होण्यास काही कारण दिसत नाही. तरी साधारणपणे इतर माजिस्ट्रेट लोकांत व सनदी नौकरीतील माजिस्ट्रेट लोकांत कांही बाबतीत फरक आहे हे कबूल केले पाहिजे. राजकीय कारणांसाठी या लोकांकडे हे अधिकार ठेवणे जरूर असेल तर, जिल्ह्याचे कलेक्टराचा माजिस्ट्रेटी अधिकार त्याचे हाता- खालील एका असिस्टंटास देण्यास त्यास परवानगी ठेवावी, व एकाच वेळी दोन्ही अधिकार खालचे दर्जाचे असिस्टंट कलेक्टरांस देण्यात येऊ नयेत असें ठरवावें, ह्मणजे हल्लींची अडचण दूर होईल.