पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व त्या झाला आहे. इंग्रज सरकारचे अमदानीपूर्वी दिवाणी, फौजदारी, मुलको व बंदोबस्त ठेवण्याचे हे अधिकार एकाच अंमलदाराकडे असत; इंग्रजी अमलांतही ते अधि- कार पहिल्याने एकच अंमलदाराकडे होते; पुढे ती स्थिति पालटत गेली ती कशी व वेळो वेळी कशा व्यवस्था होत गेल्या तें वर सांगितलेच आहे. आतां दिवाणी काम व फौजदारी महत्वाचे गुन्ह्यांसंबंधाने चौकशीचें व अपिलाचें काम, ही कामें न्यायाचेच कामासाठी नेमलेले अंमलदारांकडे आहेत. फौज- दारी अव्वल चौकशीनें काम बहुतेक (ह्मगजे सेशन कोर्टाचे आधकारांतील गुन्हे शिवायकरून, इतर गुन्ह्यांचे संबंधाचें ) ज्यांचेकडे राज्यव्यवस्थेचे काम आहे असेच मुलकी अंमलदारांकडे असते, हीच या खात्यासंबंधानें तकरारीची मुख्य बाब आहे. असे प्रकारे राज्यव्यवस्थेचें व न्यायाचें काम एकाच अंमलदाराकडे अस. ण्यांत अनेक अडचणी व भानगडी उत्पन्न होतात. मीठ, अफू, जंगल, मादकपदा- थांचे कर, हत्यारे यांसंबंधाचे व जमनिमहसुलाचे कायदे यांत प. दोपदी शिक्षा ठेवल्या आहेत, कायद्याप्रमाणे करण्याचे कामांची व्यवस्था ज्या अंमलदारांकडे असते, त्याच अंमलदारांकडे त्या कायद्याविरुद्ध केलेले गुन्ह्यांची चौकशी करून निकाल करण्याचे काम असते. हे कायदे जरी त्रासदायक आहेत तरी, त्यांची अंमलबजावणी ज्या त-हेनें होते. त्यामुळे ते फारच उपद्रवकारक होतात. त्या व्यवस्था पाहण्याचे व न्याय करण्याचे काम एकाच अंमलदाराकडे असण्याने कसेही तन्हेची फिर्याद असो, शिक्षाही होतेच; व साधारण समज असा आहे की असे गुन्हे सोडले तर तसे करणारे अधिकाऱ्यांस त्यांचे वरिष्ठांकडून दपटशा येतो. यापासून निरपराधी लोकांस फार वेळा त्रास होतो व एकंदर लोकांचे मनावर परिणाम वाईट होतो. न्याय करण्याचे व राज्यव्यवस्थेचे कामांत असलेले अंमलदारांस अगदी भि- न प्रकारची कामें करावी लागतात. न्यायाचें काम नियमित वेळी व नियमांस अनुसरून एकेच ठिकाणी बसून करावें लागते. राज्यकारभाराचे कामांस काळ व स्थळ यांची मर्यादा नाही, ते सर्व काळ व वेगळाले ठिकाणी जाऊन केले तरच चांगले होते. राज्यव्यवस्थेचे काम पहातांना अंमलदारांची मुख्य नजर, त्या- पासून होणारे नफ्यातोट्यावर असते; न्यायाचें काम करणारे अंमलदारांचे परिणामासंबंधानें पूर्ण औदासिन्य असते. या कारणांसाठी ही दोन कामें करणारे अंमलदारांची मने वेगळाले प्रकारची बनतात. न्यायाचें काम नीट रीतीने कर तां येण्यास एका विशेष प्रकारचें मन बनावें लागते; कायद्याचा पहिल्याने चांगला अभ्यास करावा लागतो व त्याचा व्यासंग सारखा कायम ठेवावा लागतो. मुलकी