पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८० सालों सन ( ९६) अपिलांचे व त्यांतील निकालासंबंधाने पाहतां सन ६१३८७ इसमांनी अपीलें केली होती, त्यांपैकी ११४७५ इसमांच्या शिक्षा रद्द झाल्या होत्या. १८९१ साली १४७१७७ अपिलें झाली त्यांपैकी २१६१२ इसमांच्या शिक्षा रद्द झाल्या. सन १८९२ साली १५२८०९ इसमांनी अपीलें केली, त्यांपैकी २३२६८ लोकांच्या शिक्षा रद्द झाल्या. ह्मणजे साधारणपणे अपिलांपैकी शेकडा ३५ पासून ४४ अपिलांत शिक्षा कायम झाल्या व शेकडा १८ पासून १५ पर्यंत लोकांच्या शिक्षा रद्द झाल्या. गुन्हा शाबित झालेले लोकांस कोणत्या शिक्षा किती झाल्या होत्या याचे प्रमा- ण असे दिसून येते की, सन १८९१-९२ साली दंडाची शिक्षा शेकडा ७४°४२ लोकांस, कैदेची शिक्षा २२-७३, फटक्यांची शिक्षा २५५, फाशीची शिक्षा००६ व हद्दपार करण्याची शिक्षा ०.२४ लोकांस याप्रमाणे शिक्षा झालेल्या होत्या. सन १८८१ चे आंकड्यांशी तुलना करून पहतां फांशीच्या शिक्षा सन १८९१ साली कमी झाल्या व दंडाचे शिक्षेचे संख्येत थोडी वाढ झाली. याप्रमाणे गुल्ह्यांची व त्यांचे चौकशीची हकीकत आहे. पूर्वीपेक्षां आतां पोलीस ठाणी जास्त झाल्याने, व त्यांवरील अंमलदारही पूर्वीपेक्षा चांगले अस- ल्याने, व गांवचे पोलिसांतही सुधारणा झाल्याने, पूर्वीपेक्षां आतां गुल्ह्यांचा स्फो- ट जास्त होतो, तरीही पुष्कळ गुन्हे छपले जातात व हिंदुस्थानांतील लोक जरी शांतताप्रिय व कायद्याप्रमाणे वागणारे आहेत तरी लोकसंख्या फार मोठी असलेमुळे बंदोबस्तास नौकरांची संख्याही फार मोठी लागते. खेडेगांवचे जागले किंवा पाहरेकरी लोक हे पुष्कळ प्रसंगी चोरटे वर्गाचे असतात, यामुळे गुन्ह्यांची परिस्फुटता होण्यास अडचण पडते व लोकमतही गुन्ह्यांचे चौकशीस मोठेसें मदतीचे होत नाही. पूर्वी गांवचे मुख्यास गुन्ह्यांच्या वगैरे सर्व खबरा असत, परंतु अलीकडे त्या मुख्यांचे महत्व कमी होत चालले आहे असें ह्मणतात व त्यामुळे सर्व तपासाचा भार पोलिसावरच पडतो; व पोलीस तर लोकांचे मर्जी- तले नाही. शिवाय नेहमी गुन्हे करणाऱ्या जाती या देशांत पुष्कळ आहेत; त्यांचा बंदोबस्त करण्याचेही कांहीं प्रांतांत पोलिसास एकमोठे काम असतें.गांवगंना गैरचा- लीचे लोकांचे रजिष्टर ठेवणे व असे लोकांचे मुख्यापासून मुचलके घेणे हे जास्त जारीने झाल्यावर, हल्लींपेक्षा जास्त चांगला बंदोबस्त होईल असा अजमास आहे. कोर्टावरही असा शक आहे की, ती पुराव्यावर वाजवीपेक्षां फाजिल गैरभरवसा ठेव- तात व अपीलकोटांत आपला ठराव फिरेल या भीतीने, त्यांचे मनाची आरोपीचे गुन्हेगारीबद्दल खात्री झाली तरी, आरोपीस सोडून देतात; व गुन्हे शाबीत झाले तरी शिक्षा जरब देत नाहीत. न्यायाधीश चांगले शिकलेले असतात यामुळे