पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मध्य जे गांवांतील कनिष्ठ दरजाचे लोक करतात, परंतु उत्तर हिंदुस्थानांतील दरोडे पूर्वीचे याच वर्गाचे लोक किंवा पर ठिकाणांहून आलेले फिरस्ते गुन्हेगार लोक करतात. बंगाल्याकडे या गुन्ह्यांस जमीनदार लोक सामिल असतात. प्रांतांतील दरोडे नेहमी हाच धंदा करणारे डोंगरी लोक असतात ते मिळून घालतात. हे गुन्हे सांपडण्यास रयतेकडून भीतीने किंवा सुस्तीने किंवा इतर कारणांनी मदत होत नाही. गुन्हे करणारे कनिष्ट दर्जाचे लोक गांवोगांव आहेतच, त्यांस नायक मिळाला किंवा पोलिसाचे वंदोबस्ताची थोडी ढिलाई झाली की हे लोक गुन्हे करण्यास प्रवृत्त होतात. असे गुह्यांची शाबिती शेकडा सुमारे पंचवी- सपासून तीस कज्यांत होते. हे गुन्हे सन १८८० साली सर्व हिंदुस्थानांत ९८१ झाले होते व सन १८९१ सालांत सुमारे १६१३ झाले होते, मध्यंतरी ती संख्या २३२८ पर्यंत वाढली होती. पुढील पत्रकांत पहिले वर्गाचे गुन्ह्यांची संख्या व त्यांत शावितीचे प्रमाण कसें होतें तें दिले आहे. गुन्ह्याचें नांव फिर्यादींची संख्या. फिर्यादींपैकी दरशेकडा शावितीचे प्रमाण. १८८० १८९१ १८९१ खून १७७९ शरीरासंबंधी इतर मोठे गुन्हे . १८०१४ २७३४३ लोकांचे स्वस्थतेसंबंधी गुन्हे ७८२५ ११०६६ दरोडे ९८१ १६१३ २३ गुरांची चोरी २१५७७ २६८६७ ३८ इतर प्रकारच्या चोऱ्या १५२७४२ १७८७३५ ३२ घरफोडी ७९५२७ १५३५८१ १६ सार्वजनिक अपक्रिया. ८१२६८ १३६७१६ व्हेनन्सी (भटकणे) ११०२४ १७२५३ ७३ १८८० ४४ ३२ ३१ १२ ९१ ९० ७८ ४१ ... ५८५९०४ ७३२८३२ गुन्ह्याचे शावितांचे सामान्य प्रमाण. पोलिसास माजिस्ट्रेटाचा हुकूम असले शिवाय तपास करतां येत नाही असे गुन्ह्यांचे प्रमाण शेकडा ४४ आहे हे वर सांगितलेच आहे. हे गुन्हे विशेष महत्वाचे नसतात. सन १८९१।९२ साली ५९२३०० फिर्यादी आल्या होत्या, त्यांपैकी सुमारे एक चतुर्थांश म्युनिसिपालिटीच्या वगैरे संबंधाने होत्या. अप-