पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९३ ) येतात. गेले १० सालांत ह्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे, तरी शिक्षा झालेल्या लोकांचे संख्येत तशी वाढ झालेली नाही. फिर्यादीचे मानाने शिक्षांचे प्रमाण सन १८८१ साली ४२ होते, ते आतां ४१ झाले आहे. फिर्यादीत वाढ झालेली आहे ती घरफोडी चोरी व सार्वजनिक अपक्रिया या गुन्ह्यांत झाली आहे. इतर गु- न्ह्यांच्या फिर्यादीचे संख्येत कमजास्तपणा होतो, तसा शिक्षा झालेले गुन्ह्यांचे संख्येत झालेला नाही. शिक्षा झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण सन १८८० साली ४२ होतें, सन १८८६ साली ४३ होते व सन १८९१ साली ४१ होतें. सार्वजनिक अपक्रियेचे फिर्यादीपैकी शेकडा ९० इसमांस शिक्षा होतात. हे गुन्हे कमी केले तर शिक्षा झालेले ( शावित झालेले ) गुन्ह्यांचे प्रमाण पुष्कळ कमी होते. चोरी व घरफोडीचे गुन्हे फारच कमी शावति होतात. याचे कारण असे दिसते की, फार वेळा असे प्रकारच्या फिर्यादी त्या मालाचे हक्क संबंधाच्या तंट्यावरून किंवा आकसाने झालल्या असतात व दुसरें कारण असे की, माल सांपडल्यावर- ही दागिने एकच नमुन्याचे असले मुळे ते ओळखण्याची अडचण पडते. दंगे या सदरांत साधारण घरगुती भांडाभांडीमुळे चार लोकांचे जमावाने झालेले तंटे येतात, तसेंच अलीकडे हिंदुमुसलमानांचे धर्मसंबंधावरून तंटे होतात तेही येतात. सन १८८५ सालापासून हिंदु व मुसलमानांचे धर्मविधी कालमानाने एक- च वेळी पडल्याने हे तंटे जास्त होऊ लागले आहेत. खुनाबद्दल फिर्यादी सन १८८० साली ११०००० लोकसंख्येस १ या प्रमाणाने झाल्या, त्यांचे प्रमाण सन १८८६ साली नव्वद हजार लोकसंख्येस एक व सन १८९१ साली ८६ हजारांस एक असे पडले. या फिर्यादीपैकी शेकडा ३७ पासून ४४ शा- बीत झाल्या. दरोड्याचे गुन्ह्याचे संबंधाने विचार पाहतां, त्यांत साधारण संधी सांपडल्या वेळी एखादें घर लुटणे किंवा रस्ता लूट करणे ही एक तन्हा व कांहीं मंडळी एखादे नायकाचे हाताखाली मिळून हम्मेष हे गुन्हे करणे ही दुसरी त हा असे या गुन्ह्यांत दोन पर्याय आहेत. पहिल्या प्रकारचे गुन्हे साधारण पीकपाणी बरोबर झाले नाही ह्मणजे वाढतात. दुसरे प्रकारचे गुन्ह्यांस चांगला नायक, संस्थानिकांचे हद्दींचे सांनिध्य, ह्या सोई जुळाव्या लागतात ह्मणून हे गुन्हे नियमितपणाने होत नाहीत. ब्रह्मदेश खालसा करण्यात आल्यावर त्या देशांत व शेजारचे डोंगरी प्रांतांत हे गुन्हे फार होत होते, परंतु खरें मटले असतां ते राजकीय कारणांनींच उपस्थित झालेले होते. संख्येचे मानाने पाहतां हे गुन्हे मद्रासेस जास्त होतात, व त्यांचे खालोखाल बंगाल्यांत होतात, त्यांचे नंतर वायव्य प्रांत, मुंबई व पंजाब यांचे नंबर लागतात. मद्रासेंत हे गुन्हे अन्नपाण्याची ददात झाली ह्मण-