पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाल्या. दहा ( ९२ ) रणारे अंमलदार पुरेसे नाहीत, यामुळे काम तुंबले आहे. पंजाब प्रांतांत या साली फिर्यादी कमी दाखल झाल्या व त्याचे कारण महामारीचा उपद्रव व तापाची सांथ या प्रांतांत होती, हे देण्यात आले आहे. ब्रह्मदेशांत या साली काम फार दाखल झाले व हल्ली असलेले न्यायाधीश पुरेसे नसल्यामुळे काम तुंबले आहे. मध्यप्रांतांत सन १८९१-९२ साली नेहमीपेक्षा कमी फिर्यादी दाखल झाल्या होत्या परंतु सन १८९२ साली पूर्वीप्रमाणेच दाखल रुपयांचेपेक्षा कमी किमतीचे दावे मात्र कमी दाखल झाले. या सा- लीं अपिलांचे काम दिपुटी कमिशनरकडून नवीन अपिलें ऐकण्यासाठी नेमलेले जजांकडे देण्यांत आले. आसाम प्रांतांत सन १८९१-९२ साली फिर्यादी दाख- ल झाल्या होत्या त्यापेक्षा या सालीं जास्त दाखल झाल्या, परंतु या दोन्ही साली दाखल झालेल्या फिर्यादी पूर्वीपेक्षा कमीच होत्या. व-हाडांत या साली फिर्यादी दाखल जास्त झाल्या परंतु त्या सर्वांचा सालाचे सालांत निकाल झाला. मद्रास इलाख्यांत खुद्द इलाख्याचे शहरी एक सिटी सिव्हिल कोर्ट स्थापन झाले, प्रांतांत जास्त डिस्ट्रिक्ट मुनसिफ नेमिले, हायकोर्ट नवीन इमारतींत गेले अशा विशेष गोष्टी झाल्या आहेत. मुंबई इलाख्यांत इतर प्रांतांप्रमाणेच दाखल झालेले फिर्या- दीत वाढ आहे, सिंध प्रांतांत सन १८९१-९२ पेक्षा कमी फिर्यादी दा- गुन्हे व गुन्ह्यांची चौकशी. फिर्यादींचे संख्येचे मानानेच पाहिले तर सन १८८१ पेक्षां आतां त्या वाढत आहेत. सन १८८१ साली दरदहा हजार माणशी ५५ फिर्यादी होत होत्या, तर सन १८९१ साली त्या ५९ पडल्या. दिवाणी फिर्यादींची तशी वाढ झालेली नाहीं; याचे कारण असे दिसते की दिवाणी दावा दाखल करण्यास जसा खर्च लागतो तसा फौजदारीत फिर्याद करण्यास पडत नाही. आतां या संख्येपैकी अगदी निखालस खोट्या फिर्यादी ह्मणून पोलिसाकडून काढून टाकण्यात येतात त्या वजा केल्या पाहिजेत; त्या वजा केल्या ह्मणजे देरदहा हजार माणशी ४० फिर्यादी पडतात. गुन्ह्यांचे दोन वर्ग केलेले आहेत. एका प्रकारचे गुन्ह्यांचा तपास पोलिस आ- पले अधिकाराने सुरू करतात. हे जास्त महत्वाचे गुन्हे असतात. दुसरे प्रकारचे गुन्ह्यांचा तपास करण्यास माजिस्ट्रेटाचा हुकूम लागतो. सन १८९१ सा-. ली एकंदर ३०११०० फिर्यादी झाल्या, त्यापैकी पहिल्या वर्गाच्या शेंकडा ५६ व दुसरे वर्गाच्या ४४ होत्या. दुसरे वर्गात साधारण अपक्रिया वगैरे हलके गुन्हे व महत्वाचे गुन्ह्यांपैकी खोटा दस्तऐवज करणे व खोटी साक्ष देणे हे गुन्हे खल झाल्या.