पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९१) चौकशी न होतां निकाल झाले, वादीतर्फे ६० झाले, व प्रतिवादीतर्फे ७ झाले. वादीतर्फेचे दाव्यांत शेकडा ११ टक्के कबुलीने, २८ गैरहजीरीने, १९ तक्रारी होऊन, पंचमार्फत ०४१ निकाल झाले व प्रतिवादी तर्फेचे दाव्यांत वादीचे गैरहजीरीने १३४, तकरारीने ६.२५, पंचमार्फत ०.१८ असे निकाल झाले. दहा वर्षांचे पूर्वीचे संख्येचे मानाने पाहतां या प्रमाणांत विशेषसा फरक पडलेला नाही. खालचे ब्रह्मदेशांत व आसामांत फिर्यादी काढून घेण्याची व मुंबईत आपसांत तोडजोडीची व पंजावांत, व मद्रासेंत दोन्ही त-हेनें आपसांत निकाल करण्याची प्रवृत्ति जास्त आहे. कबुलीने दावे पूर्वीपेक्षा शेकडा दोन कमी हो- तात; या त-हेनें निकाल करण्यांत व-हाडाचा नंबर पहिला आहे व मध्य प्रां- ताचा त्याचे जवळ जवळ चेतो. आतां निकालावर अपिलें किती होतात याचा विचार करून दिवाणी प्रकर्ण संपविण्याचे आहे. एकंदर दाव्यांचे संख्येचे मानाने पाहतां शेकडा ७ दाव्यांत अपिलें होतात; ह्मणजे दुतर्फी चौकशी होऊन निकाल झालेले दाव्यांत साधार- णतः सुमारे ३ शावर आपिलें होतात. अपिलांपैकी सन १८९१ साली शेकडा ६१ ठराव कायम झाले, १७ फिरले व २१ सांत ठराव पालटण्यांत आले किंवा अपिलें रद्द करण्यांत आली किंवा इतर रीतीनें निकाल लागले. सन १८८१ चे प्रमाणाशी ताडून पाहतां कायम झालेले ठरावांचें मान शेकडा ९ वाढले आहे व अपील काढून टोकण्याचे वगैरे तितकेंच कमी झाले आहे. वर दिलेले सर्व आंकडे सर्व हिंदुस्थानाचे सरासरीचे प्रमाणाने दिलेले आहेत. प्रांतवार माहिती असणे इष्ट आहे, परंतु विस्तारभयास्तव ती गाळावी लागली. तसेंच सालोसाली कोणते कारणांनी दाव्यांची संख्या कमी होते किंवा वाढते व पीकपाणी चांगले किंवा वाईट झाल्याने दाव्याचे संख्येवर परिणाम कसा होतो, वगैरे गोष्टींचे संबंधाने माहिती देणे जरूर आहे, परंतु त्यावद्दल सरकारी रिपो- टीतही विशेषसा विचार केलेला नसतो यामुळे निरुपाय आहे. सन १८९२।९३ सालांत न्यायपद्धतींत काही फरक झालेला नाही. या साली ज्या काही विशेष गोष्टी झाल्या त्या मात्र दाखल करतो. बंगाल्यांत सन १८९१-९२ सालापेक्षा जास्त फिर्यादी दाखल झाल्या. एकंदरीत पूर्वीपेक्षां काम फार वाढले अस- ल्यामुळे५९नवीन सबार्डीनेट जन्न व मुनसिफ नेमण्यांत आले. वायव्य प्रांतांत सन १८९१-९२सालाचे पूर्वी काही साले फिर्यादी कमी दाखल झाल्या होत्या,परंतु सन १८९२-९३साली त्या पूर्वी प्रमाणे दाखल झाल्या. या प्रांतांत हल्ली असलेले न्याय क-