पान:हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिति.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८७) ण्याचा अधिकार देण्यात आला. या कोर्टात इलाख्यांचे शहरांचे टापूतील अवल दावे चालतात व अपीली व विशेष न्यायाचे अधिकारांत खालचे सर्व दिवाणीव फौजदारी कोटीवर त्यांचा अंमल चालतो. पूर्वी तीन ठिकाणी हायकोर्टे होती. वायव्य प्रांतांत १८६६ त एक नवीन हायकोर्ट स्थापन करण्यांत आले. पंजाबांत हायकोटांचा अधिकार चीफ कोर्ट ह्मणून आहे ते चालविते. या हायकोटीत एक मुख्य जज बहुशा विलायतेंतील चांगले प्रख्यात बारिष्टरांपैकी असतो व कांहीं प्यूनी जज असतात; त्यांत कांहीं सनदी नौकरांपैकी व कांहीं वारिष्टर किंवा आडव्होकेटपैकी असे असतात. सन १८९३ साली सर्व हायकोर्टात मिळून चीफ जनासुद्धा एकंदर ३२ जज होते व त्यांत ६ नेटिव्ह होते. अलीकडे के- राची, रंगून व एडन येथील कोटीस आडमिरल्टीचे ( समुद्रावरील ) खटल्यांचा अधिकार दिला आहे. मद्रासेस अडीच हजारांपर्यंत रकमांचे दाव्यांचा निकाल करण्यासाठी एक कोर्ट स्थापन करण्यांत आले आहे; या नवीन व्यवस्थांमुळे हायकोर्टात पूर्वी चालत असलेली काही कामें या कोटीत चालतील. वायव्य प्रांतांतील हायकोर्टास अयोध्या प्रांतांतील कजयांत येथील दोन जुडिशियल कमिशनरांत मतभेद झाला असता त्यांचा निकाल करण्याचा अधिकार आहे. नानरेग्युलेशन प्रांतांत न्यायखात्यांतील मुख्य अधिकारी जुडिशियल क- मिशनर असतो. हे अंमलदार बहुतेक सनदी नौकरांपैकीच असतात. अलीकडे अयोध्या प्रांतांत कमिशनरची जागा एक जास्त करण्यांत आली आहे, तिजवर १० वर्षे काम केलेला बारिस्टर नेमला तरी चालेल असें ठरले आहे. हल्ली त्या जागेवर बारिस्टराचीच नेमणूक झालेली आहे. चा वरिष्ठ कोटींचे खालचे पायरीचे न्यायाधिकारी जिल्ह्याचे जज्ज, यांचेकडे दिवाणी व फौजदारी अशी दोन्ही कामें चालतात. फौजदारी कामें त्यांचेकडे खालचे माजिस्ट्रेट लोक प्रथमची चौकशी करून पाठवितात, व खालचे दिवाणी कोटांवर अपिले त्यांचेकडे चालतात. अवल दावे चालण्याचे अखेरचें कोर्ट हेंच आहे. पंजाबांत चीफ कोर्ट व जिल्हा जज्ज यांचे दरम्यान एक डिव्हिजनल जज्ज असतो. ब्रह्मदेशांत दिवाणी कामें मुलकी अंमलदाराकडेसच चालतात व डिव्हिजनल कमिशनर हे सेशनजज असतात. योग्य वाटेल त्या प्रसंगी डेपुटी कमिशनरांस सेशनजज्ज नेमण्याचा अधिकार ठेवला आहे. अयोध्या प्रांतांत दिवाणी काम मुलकी कामगारांकडून सन १८९० सालों काढण्यात आले आहे. दिस्ट्रिक्ट जज्जाचे खालचे दिवाणी अधिकारी सबा- र्डिनेट जज्ज हे आहेत व त्यांच्यांत निरनिराळे वर्ग आहेत. याशिवाय लहान दाव्यांचा निकाल करण्यासाठी काही प्रांतांत मुनसफ आहेत. पंजाबांत आनररी