पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/71

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास (य) सर्व वासनांच्या त्यागामध्ये त्यांनी आनंद मानावा आणि धर्माचरणांत आनंद मानावा. (र) कारण हे धर्माचरण येथे व इतरत्र फलदायी होई. अभ्यास :--१. तेराव्या शासनानुसार खरा विजय कोणता ? असा विजय कोणकोणत्या भागावर अशोकाने मिळविला आहे ? २. कलिग विजयानंतर अशोकास कोणते दुःख झाले होते ? ३. अशोकाच्या समकालीन कांहीं परकीय राजांची नांवे सांगा. 'यवन' याचा अर्थ काय ? २० ; धौली येथील लेख (क) देवप्रियाच्या वचनानें तोसलि येथील महामात्र जे नगराचे न्यायाधीश आहेत त्यांस कळविले जात आहे कीं, (ख) जे मी योग्य म्हणून मानतों तें मी अनेक उपायांनी घडवून आणतों. (ग) आणि हें (लिखित) तुम्हाला सूचना करण्यासाठी योजलेल्या उपायांतील मुख्य आहे. (घ) कां कीं तुम्ही हजारों मनुष्यांशी त्यांचे प्रेम संपादन करून घेण्यासाठीं गुंतले अहांत. (ङ) सर्व लोक मला अपत्यासमान आहेत. (च) आणि मी आपल्या अपत्यांसाठी हें इच्छितों कीं, त्यांच्या इहलोकींच्या आणि पारंलोकिकच्या कल्याणांची तरतूद व्हावी; इतर मनुष्यांविषयीं देखील मी तेच इच्छितों. । (छ) माझे हे हेतु किती दूरवर पसरले आहेत हे आपणांस ठाऊक नाहीं काय ? | (ज) कोणा विशिष्ट व्यक्तीला हे समजते आणि त्यालादेखील हें। अंशेकरून समजते, पुरे समजत नाहीं. (झ) तुमची जरी तरतूद करून ठेवली आहे तरीहि ऐका, (ञ) असे होते की, राजव्यवहारांत कोणातरी एकाला बंदिवास अगर कठोर वागणूक प्राप्त होते.