पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/70

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शासन १३ वें ३७ तरी कायम आहे. ते त्यांस शासन करण्याचे सामर्थ्य त्यांना कळविले जाते. अशाकरितां कीं त्यांना आपल्या अपराधांबद्दल लाज वाटावी आणि त्यांस मृत्यु येऊ नये. (ण) कां कीं अपराध झाला असतांहि देवानांप्रिय सर्वाविषयीं अहिंसा, संयम आणि नि:पक्षपातीपणा यांचा अवलंब करू इच्छितो. ... (त) आणि हाच जय तो खरा जय आहे असे देवानांप्रिय मानतो. (थ) आणि हा जय देवानांप्रियाने वारंवार मिळविला आहे. हा शेजा-यांवर मिळविला आहे आणि त्याचप्रमाणे जे सहा हजार योजनांवर राहतात--जेथे यवन राजा अंतियोक राज्य करत आहे--जथे अंतियोकापलीकडे चार राजे आहेत म्हणजे तुरमाय नांवाचा, अतिकिनि नांवाचा, भग नांवाचा आणि अलिकसुंदर नांवाचा आणि दक्षिणेकडे चोड, पांड्य, , ताम्रपणीपर्यंत. (द) त्याचप्रमाणे या राजाच्या राज्यांत योनांमध्ये आणि कांबोजांमध्ये, नभकांमध्ये आणि नभितांमध्ये, योजांमध्ये आणि पितनिकांमध्ये, आंध्रांमध्ये आणि पलिदांमध्ये सर्वत्र लोक देवानांप्रियाचे धर्मशिक्षण घेत आहेत. (ध) जेथे देवानांप्रियाचे दूत जात नाहींत तेथे देखील देवानांप्रियाची धर्मकर्तव्ये आणि शासने ऐकून लोक धर्माचरण करत आहेत. (न) हा जय सर्वत्र मिळविला आहे. हा वारंवार मिळविला आहे आणि तो संतोषाची भावना उत्पन्न करीत आहे. (प) धर्माच्या योगानें जो विजय उत्पन्न होतो त्याच्या योगानेच मला समाधान उत्पन्न होते. (फ) पण या संतोषाचे महत्त्व देखील थोडेच आहे. (ब) देवानांप्रियास वाटते की परलोकीं प्राप्त होणारे फल अधिक मोठे आहे. | (भ) आणि ज्या हेतूने पुढील धर्मलिपि लिहिली जात आहे, तो हा की माझे जे पुत्रपौत्र होतील त्यांनी नवीन विजयांचा विचार करू नये आणि जर विजयांची इच्छा झालीच तर दया अणि हलक्या शिक्षा त्यांनी द्याव्या अणि धर्मविजय तोच खरा विजय संमजावा. (म) हाच विजय इहलोकीं आणि परलोकीं फलदायी होतो.