पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ धौली येथील लेख (ट) जर कोणी दंड चुकविण्याचा हुकूमनाम मिळविला आणि इतरांची शिक्षा चालू राहिली. (5) अशा प्रसंगी तुम्ही या सर्वांशी समतेने (म्हणजे पक्षपात न करतां) वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. | (ड) परंतु पुढील स्वभावामुळे मनुष्याकडून योग्य वागणूक होत नाहीं. ते स्वभाव म्हटले म्हणजे असूया, राग, क्रूरता, घाई, आळस आणि थक वा हे होत. (ढ) तर तुम्ही हे स्वभाव आपल्या ठायीं उत्पन्न होऊ नयेत म्हणून प्रयत्न केला पाहिजे. (ण) या सर्व गोष्टींच्या मागे क्रोधाचा व घाईचा अभावहीं पाहिजेत, (त) जो थकला आहे तो चढू शकणार नाहीं; परंतु प्रत्येकानें हालले पाहिजे चालले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. । (थ) जो इकडे लक्ष देईल त्याने तुम्हांला सांगितले पाहिजे की। तुम्ही अनृण्य जोडा, आणि देवप्रियाची आज्ञा अशी अशी आहे. (द) याचे अवलंबन अत्यंत फलदायी आहे अणि अनवलंबन हे मोठे अनिष्ट आहे. | (ध) कां कीं जर कोणी याचे अवलंबन चुकवील तर स्वर्गप्राप्ति होणार नाहीं व राज (प्रीति) लाभ देवील होणार नाहीं. , , (न) कां कीं जर कोणी आपले कर्तव्य चुकवील तर माझे मन प्रसन्न कसे होईल ? (प) पण जर तुम्ही याचे अवलंबन कराल तर स्वर्ग मिळवाल आणि तुम्ही माझ्या ऋणापासून मुक्त व्हाल. (फ) हे शासन (लिपि) सर्वांनीं तिष्य नक्षत्राच्या प्रसंगीं ऐकावे. (ब) आणि तिष्य नक्षत्र असतां हें प्रत्येकाने आणि अनेकदां ऐकत जावें. (भ) आणि जर तुम्ही असे वागाल तर तुम्ही आपले कर्तव्य करू शकाल. (म) पुढील हेतूंसाठी ही लिपि येथे लिहिली आहे, (क) नगराच्या न्यायाधीशांनी यासाठी नेहमी प्रयत्न करावा म्हणून अ.णि गैरवाजवी बंधनें उत्पन्न होऊ नयेत आणि लोकांना कठोर रीतीने वागविले जाऊ नये म्हणून, (य) आणि या हेतूच्या सिद्धीसाठी मी दर पांच वर्षांनी असा (एक