Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास व्यक्त झाले आहेत. त्यांतील उपमा वाचकांचे चित्त वेधून घेणा-या आहेत. चाणाक्ष वाचकांस त्यांतून तत्कालीन जीवनाचे ओझरतें दर्शनहि होऊ शकेल. मूळ संस्कृतांतील ही प्रार्थना वैदिक ब्राह्मण स्वरसंहिते-सहित गंभीरपणे म्हणतांना एकवार ऐकलें तर कळून येईल की ध्वनि आणि अर्थ यांचा एकजीव झाल्याचे ऋग्वेदाएवढे दुसरें उत्कृष्ट उदाहरण नाहीं.] मंडल दहा-सूक्त ७५ वें (१) हे उदकांनो, तुमचे मोठे उत्कृष्ट स्तोत्र, स्तुतिकर्ता विवस्वानाच्या घरीं म्हणत आहे. पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग अशा तीन ठिकाणीं विभागून सात सात* अशा नद्या वाहतात. वाहणा-यांत सिंधू बलाने सर्वात श्रेष्ठ आहे. (२) हे सिंधो, ज्या अर्थी सुपीक अशा प्रदेशांतून तुझा प्रवाह गेला आहे त्या अर्थी तुझे जाण्याचेहि मार्ग वरुणाने खोदले असले पाहिजेत. तसेच तू जमिनीच्या उंच शिखरावरून खालीं वहात येतेस, त्यामुळे तू या जगावर सत्ता चालवितेस. (३) तुझा जमिनीवरचा आवाज स्वर्गलोकावर जातो. आपल्या लाटांनी ही सिंधु आपलें अनंत सामर्थ्य प्रकट करीत असते. पाऊस मेघांच्या द्वारा जसा गर्जत असतो किंवा बैल ओरडत धांवत असतो तशी सिंधु नदी खळाळत असते. (४) हे सिंधो, आई पुत्राबरोबर जाते किंवा नुकतीच प्रसूत झालेली गाय वासरामागे जाते तसे इतर नद्या शब्द करीत सिंधूच्या मागे जातात. | (५) हे गंगे, यमुने, सरस्वती, शुतुद्रि', परुष्णि', आणि हे असिक्नी सहित, असणारे मरुवृद्धे, हे वितस्तेसहित व सुषोमेसहित असणारे आर्जीकीये तुम्ही माझे स्तोत्र ऐका. (६) हे सिंधो, तू वाहत्या गोमतीला मिळण्याकरितां प्रथम तृष्टामा नदीला मिळालीस. नंतर तू सुसर्तु, रसा, श्वेती, कुभा आणि मेहत्नु यांना मिळालीस, यांच्यासह तू एका रथांत आरूढ झालीस. ।

  • पंजाबला सप्त सिंधूचा प्रांत असे म्हणतात. सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बिआस, सतलज व सरस्वती या त्या सात नद्या असाव्यात. खुद्द पंजाब हें नांव पंच + आप (पाणी) पांच नद्यांचा प्रदेश या अर्थाने रूढ झाले आहे.

१ सतलज, २ रावी, ३ चिनाब, ४ झेलम, ५ काबूल, बाकी अनिश्चित.