पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास भाग १ ला । प्राचीन काल www स्त सिंधूची प्रार्थना [ सुमारे चार हजार वर्षांपूर्वी सप्तसिंधूच्या (पंजाब) प्रांतांत वसाहत करण्यास आलेल्या आर्यानीं पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांची मनोभावे पूजा केली. निसर्गावर मानवी जीवन सर्वस्वी अवलंबून होते. तेव्हां निसर्गातील पंचमहाभूते हीं तत्कालीन मानवांस देवतारूप वाटल्यास नवल नाहीं. आर्यांनी त्यांच्या स्तोत्रे रचिलीं व गायिलीं. ऋग्वेदांत अशी अनेक स्तोत्रे आढळतात. ऋग्वेद हे जगांतील अत्यंत प्राचीन वाङ्मय होय. इतिहासाच्या अध्ययनास याहून जुना ग्रांथिक पुरावा उपलब्ध नाहीं. मोहेंजोदरो संस्कृतीचे ज्ञान आपणांस वस्तूंच्या अवशेषावरून होते. | पं. जयचंद्र विद्यालंकार यांचे असे म्हणणे आहे कीं, महाभारतकालांत कृष्ण द्वैपायन नांवाचे मुनि होऊन गेले. उत्तर प्रदेशांत इतस्ततः विखुरलेल्या ऋषींच्या आश्रमांत ज्या ऋचा म्हटल्या जात त्यांचे त्यांनी एकीकरण केले व त्यांची ऋषिवारीने आणि विषयवारीने मांडणी केली; हीच रचना आतांपर्यंत चालत आली आहे. ऋग्वेदाच्या दहाहि मंडलांचे मराठी भाषांतर पुण्याचे विद्यानिधि सिद्धेश्वरशास्त्री चित्राव व श्री. शं. रा. दाते यांनी परिश्रमपूर्वक केले आहे. दहाव्या मंडलांतील सूक्त ७५ व १२१ यांचा अनुवाद पुढे दिला आहे. ऋग्वेदाचे मराठी भाषांतर-मंडल दहावे-पृ. ५० व पृ. ८५ पहा. | पहिल्या उता-यांत आर्यांनी सिंधू नदीचे स्तोत्र गायिले आहे. खळखळाट करीत वाहणा-या व स्वतःस संजीवन देणा-या नदीच्या, प्रवाहाकडे प्रसन्न चित्ताने पाहात असतां मनांत आलेले विचार येथे