पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परमेश्वराचे स्वरूप । ३ (७) सरळ वाहणारी, स्वच्छ आणि झकझकीत अशी सिंधु खूप वेगाने वाहात असते. अदम्य सिंधु वेगवानांतली वेगवान् आहे. एखादी आश्चर्यकारक वेगशाली घोडी असावी, तसेच एखादी देखणी स्त्री असावी त्याप्रमाणे सिंधु आहे. (८) चांगले घोडे, उत्तम रथ, सुंदर वस्त्रे, सोन्याचे दागिने घातलेली, अन्न आणि लोंकर उत्पन्न करणारी, दोच्या करण्याचे गवत असलेली, पुण्यशील, सुंदर अशी सिंधु नदी, निर्गुडी वगैरेची झाडेहि आपल्या तीरावर धारण करते. (९) सुंदर खिडक्यांच्या .... आणि घोडे जोडलेल्या अशा रथांत बसून येऊन सिंधू आम्हाला अन्न देवो. बळकट, कीर्तिमान् आणि मोठ्या अशा सिंधूच्या रथाची युद्धांत नेहमी स्तुति करतात. अभ्यासः--१. या स्तोत्रांत वणलेल्या सर्व नद्यांची नांवें सांगा व त्यांपैकीं नकाशांत कोणत्या सांपडतात ते पहा. २. अर्याची वस्ती कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये होती असे कळते ? ३. नद्यांपासून कोणते फायदे मिळतात असे या सूक्तांत सांगितले आहे ? ४. उपमा देतांना कोणत्या जनावरांचा उल्लेख आलेला आहे ? त्यावरून काय अनुमान काढतां येते ? २ः । परमेश्वराचे स्वरूप मंडल दहा--सूक्त १२१ वें । [-हें सूक्त अत्यंत महत्त्वाचे आहे. कस्मै देवाय हविषा विधेम' म्हणजे 'सुख'स्वरूप देवाची आम्ही उपासना करतों में पालुपद सर्वत्र | आहे. परमेश्वराच्या अफाट सामथ्र्याविषयींची स्तोत्रकत्याची कल्पना निश्चित व उच्च दर्जाची आहे-] (१) हिरण्यगर्भ नांवाचा परमेश्वर सृष्टीच्या पूर्वी होता. उत्पन्न झालेल्या जगाचा तोच एक धनी आहे. त्यानेच हे पृथ्वीपासून द्युलोकांपर्यंत सर्व उत्पन्न करून संरक्षण केले. म्हणून आम्ही त्या सुखस्वरूप परमेश्वराचो उपासना करतो. (२) जो आत्मज्ञान देणारा आणि बल देणारा आहे आणि ज्याची सर्व लोक आणि देवहि आज्ञा पाळतात, ज्याच्या सावलीत अमरपणा आहे किंवा मृत्यु आहे, त्या सुखस्वरूप परमेश्वराची आम्ही सर्व प्रकारें उपासना करतो.