पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास स्वतः लिहिलेले पत्र आलें. ((A Letter from the Rajah, written by himself to Raoji) त्यांत शिवाजी ४०० निवडक लोकांसह जातीने इस्तेखानाच्या तळावर गेला त्याची हकीगत आहे. -३- नं. १६४० ८ मे १६७४ नारायण शेणव्याकडून तहाबद्दलचे शिवाजीच्या सहीचे (Signed by Sevagy) कागद आले. त्यांचे भाषांतर करून पहातां, पूर्वी ठरल्यापेक्षा कित्येक गोष्टी अधिक घातलेल्या दिसून आल्यामुळे, कांहीं अवश्य दुरुस्त्या पुढे मांडल्या.. | अभ्यास :--हे उतारे वाचुन शिवाजीच्या साक्षरतेसंबंधीं तुमचे मत काय झालें तें कारणासह सांगा. डफच्या मतानुयायी लोकांचे समाधान कोणत्या साधनांनीं होईल ? । संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग [आज्ञापत्र प्रकरण ८ वें. वीणा प्रकाशन प्रत (इ. स. १९३९ पृ. ३४ ते ४३]. प्रस्तुत आज्ञापत्र रामचंद्रपंत अमात्य यांनी राज्याभिषेक शक ४२ म्हणजे (इ. स.१६७४+४२) इ. स. १७१६ त छत्रपति राजारामाचा मुलगा कोल्हापूरचा संभाजी याचे आज्ञेवरून लिहिलें असें सामान्यतः । मानले जाते. पण हा सामान्य समज फारच डळमळीत करणारे पुरावे त्या आज्ञापत्रांतच आहेत. पण मग ते कोणाचे ? याचा मात्र छडा लावतां येत नाहीं. अशी आजची या विषयावरील संशोधनाची स्थिति आहे. आज्ञापत्राचा लेखक कोणीहि असो. त्यांतील वाक्य वाक्य इतके अनुभवावर व राजनैतिक तत्त्वावर आधारलेले आहे की त्यामुळे शिवकालीन शासनशास्त्रावरील, तो एक वहुमोल ग्रंथच होय. खेरीज अठराव्या शतकांतोल, प्रगत आणि जिवंत मराठी गद्यांचा तो एक नमुनाच होय. ] संपूर्ण राज्याचे सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरहि राज्य असे कोणास म्हणावे ? या करितां पूर्वी जे जे राजे झाले त्यांणी आधीं देशामध्ये १ ओसाड, ३६]