पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवाजीची साक्षरता १९१ किल्ला घेतां आला असता तर आसपासचा सर्व मुलूख शिवाजीला मिळाल्यामुळे शिवाजीकडून द्रव्य किंवा बंदरे वाटेल तशी मिळाली असती. आम्ही कैदेत असतांना राजापुरचा त्याचा ब्राह्मण मीठ बंदर आमचे स्वाधीन करण्याचे बोलला. आम्हांला पकडून ठेवून लुटल्यामुळे आतां आम्हांला वंदराची इच्छा नसल्याचे आम्हीं सांगितले; आणि आमचे स्वातंत्र्य आम्हाला मिळाल्याशिवाय आम्हीं काय बोलावे ? असे म्हटले. त्यावर त्याने आमच्या सुटकेची खंडणी नेमून आम्हाला वासोट्यावर पाठविलें..... | व्राह्मणाने आम्हाला पैशाबद्दल विचारले... आम्हीं साफ नाकारले. तेव्हां शिवाजीकरितां तुम्ही काय करितां म्हणून त्याने विचारल्यावर आम्हीं दंडाराजपुरीबद्दल बोललों ... इंग्रजांना त्याने दाभोळ देऊ केलें... दंडाराजपुरी घेण्यास इंग्रजांनी मदत केली तरी शेवटचा हल्ला शिवाजीनेच करावा म्हणजे इंग्रज किल्ला आपणच घेतील, ही भीति वाळगण्याचे कारण नाहीं.... दंडाराजपुरी घेण्याबद्दल औरंगजेब इंग्रजांना तीन लाख रुपये देण्यास तयार आहे, असे रेव्हिगटनने सांगितले. दोन दिवसांनी शिवाजी महाडला आला. दोन दिवस राहून तेथील कैद्यांना त्याने रावजी पंडिताच्या स्वाधीन केले आहे आतां तो कल्याण भिवंडीकडे आहे. नुकतेच मोगलांनी कल्याण भिवंडी घेतली आहे. या पावसाळ्यांत शिवाजी ती परत घेणार. नंतर त्याची आमची गांठ पडेल... विजापुर सुटले जाईल असे वाटते. ... शिवाजीचा एकच हेतु असेल तर तो दंडाराजपुर घेण्याचा. त्याबद्दल अत्सुकतेने बोलावे. कंपनीला ते आवडलें नाहीं तर मागाहून बोलणे फिरवावें....बरें किल्ला स्वतःकरितां घ्यावयाचा म्हटले तरी माणसे (शिपाई) लागतील. ती शिवाजीशिवाय दुसरा कोण पुरवील ? वकिलाने पत्र शिवाजीच्या स्वत:च्या हातांत द्यावे. हे ब्राह्मण त्यांना वाटेल तो मजकूर त्या पत्राकडून वदवितात. -२- नं. ९३० १२-४-१६६३. । रावजी पंडीत परत आला आहे. आल्याबरोबर मला बोलावून " तहाची कलमें ठरविण्याकरितां कोणातरी इसमाला त्वरित पाठवून द्या." म्हणून तुम्हांला मी लिहावे असे त्याने मला सांगितले. काल राजाने रावजीला [ ३५