पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संपूर्ण राज्याचे सार तें दुर्ग १९३ दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयीं परिहार केले. .....ज्या देशांत गड कोट नसतील त्या देशांत आपले राज्याचे सरहद्दीपासून पुढे जवरदस्तीने नूतन स्थळे बांधीत तो देश आक्रमावा. त्या स्थळांचे आश्रय सेना ठेवून पृढील देश स्वशासने वश करावा. असे करीत करीत राज्य वाढवावे. गडकोटाचा आश्रय नसतां फौजेच्यानें परमुलखीं टिकाव धरून राहवत नाहीं. फौजेविरहित परमलखीं प्रवेश होणेच नाहीं. इतक्याचे कारण ते गडकोटविरहित जे राज्य त्या राज्याची स्थिति म्हणजे अन्नपटलन्याय आहे. याकरिता ज्यांस राज्य पाहिजे त्यांणी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजीना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण, असे पूर्ण चित्तांत आणून कोणाचे भरंवशावर न राहतां आहे त्याचे संरक्षण करणे; व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतांच करावा, कोणाचा विश्वास में | गडकोट संरक्षणाचे कार्य फार नाजूक. परम नाजूक स्थळास एखादा मामलेदारादि जे लोक ठेवणे, त्यांणीं भेद केलियामुळे अथवा शत्रु चालोन आला असतां नामर्दी केल्यामुळे अथवा त्यांचे गाफिलीमुळे स्थळास दगा जाहला तर स्थळसहित तितकें राष्ट्र हातींचे गेलेच. उरल्या स्थळास व राष्ट्रास उपसर्ग लागला, शत्रु प्रवळ येऊन पावला असतां जो गेला किल्ला, त्या किल्लेकराचे वारे इतर राहिले किल्लेकरांस लागान नेही स्थळास अपाय योजतात. म्हणजे एक एक राज्यासच धक्का बसतो. या कारणे किल्ले कोट जतन करणे ही गोष्ट सामान्य आहे असे न समजतां, तेथील उस्तवारी व शासन यांस तिळनुल्य अंतर पडों न द्यावें. ....त्यास आधी किल्ल्याचा जीव तो किल्ल्याचा हवालदार, तसाच सदर सरनोबत म्हणजे निस्पृह, कोणाचे निसपतीचे अथवा एकाचे आर्जवामळे टेवावे असें नाहीं, ज कुलवंत मराठे आणि शिपाई जे शरम धरत असतील कजीलेदार विश्वासू, उद्योगी, अलालुची, अनिद्रिस्त, सकल लोकांचे समाधान १ व्यवस्था, बंदोबस्त. २ निसबतीचे, तर्फेचे. [ ३७